विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे शिक्षणाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे धरणे आंदोलन..


संजय कारवटकर/ यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी.

शिक्षकांच्या व कर्मचाऱ्यांच्या हक्काची जुनी पेन्शन मागणाऱ्या कर्मचाऱ्यांना मुंबई येथे झालेल्या अटकेच्या निषेधार्थ व शिक्षकांच्या अनेक प्रलंबित मागण्यासाठी विदर्भातील प्रत्येक जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर त्याचप्रमाणे यवतमाळ येथील शिक्षण अधिकारी कार्यालयासमोर विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने प्रचंड धरणे आंदोलन करण्यात आले त्यावेळी  शेंडगे व हाते साहेब यांनी आंदोलन स्थळी येऊन निवेदन स्विकारले.या आंदोलनात यवतमाळ येथील आंदोलनात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतिक उपाध्यक्ष अरविंद देशमुख जिल्हा अध्यक्ष अशपाक खान जिल्हा कार्यवाह रामकृष्ण जीवतोडे कार्याध्यक्ष विजय खरोडे ,मनोज जिरापुरे उपाध्यक्ष पवन बन, आनंद मेश्राम गणेश धर्माळे गंगाधर गेडाम जी एन नरुले सर गुंडेवाड सर बोढे सर महाकुलकर सर ताजने सर, वाघमारे सर व   शिक्षकेत्तर संघटनेचे नारायण डांगे त्याचप्रमाणे इतर पदाधिकारी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित असल्याची माहीती विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष श्रावनसिंग वडते यांनी प्रसिद्धीपत्रकाद्धारे दिली.

Previous Post Next Post