मेळघाट ची कमान प्रभारिंच्या खांद्यावर...


 

राजु भास्करे /गौलखेडा बाजार 

मेळघाट मधील महत्वाचे पद रिक्त असल्याने सदर पदावर   प्रभारी अधिकारी असल्याने विकासाची कामे खोळबंली आहेत. प्रभारी अधिकारी वेळेवर निर्णय घेत नसल्याने दुरून येणाऱ्या आदिवासी बांधवांची कामे होत नसल्याने निराश होऊन परत जावे लागत आहे.आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी श्री वैभव वाघमारे हे एक महिन्याच्या रजेवर गेल्याने त्यांचा  प्रकल्प कार्यालयाचा प्रभार सहाय्यक प्रकल्प अधिकारी  मेतकर यांचे कडे आले आहे. तर उपविभागीय  अधिकारी पदाचा  पदभार अचलपूर चे उपविभागीय अधिकारी  श्री. संदीप कुमार अपार यांचे कडे आले आहे. त्यामुळे उपविभागीय  अधिकारी  कार्यालयातील अतिमहत्वाची प्रकरणे प्रलंबित  राहत आहेत.तसेच  अती संवेदनशील असलेल्या धारणी तहसीलचे कार्यालयाचे तहसीदार अतुल पाटोळे यांच्या स्थानातरणानंतर त्यांचा प्रभार नायब तहसीलदार अनिल नाडेकर यांचे कडे आल्याने व तीन महिने लोटून ही नवीन तहसीदार न आल्याने नागरिकांची अनेक कामे प्रलंबीत आहेत.तसेच याच कार्यालयात नायब तहसीलदाराची तीन पदे रिक्त असल्याने मंडळ अधिकारी यांचे कडे त्यांचा प्रभार आहे.तसेच चिखलदरा व धारणी दोन्ही तालुक्यासाठी अति महत्वाचे असलेले दुय्यम निबंधक कार्यालयाचा उपनिबंधकाचा पदभार  लिपिकाकडे असल्याने विपरीत परिस्थितीत निर्णय घेत नसल्याने दीडशे  कि.मी. अंतरावरून आलेल्या नागरिकांना निराश होऊन परत जावे लागते.तसेच जिप बांधकाम उपविभाग धारणी चा पदभार शाखा अभियंता श्री. ठाकरे यांचेकडे दोन वर्षापासून आहे

Previous Post Next Post