झेप साहित्य संमेलनाचे अन्न व प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते होणार उद्घाटन !


 सिंदखेड राजा/सचिन खंडारे .

झेप च्या वतीने वाड्:मयीन संस्कृती दृढ व्हावी या हेतूने कवयित्री हरणाबाई जाधव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ झेप साहित्य संमेलन आयोजित करण्यात येते. यावर्षी हे संमेलन २५ व २६ डिसेंबरला  डॉ.मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्र औरंगाबाद येथे डॉ. वासुदेव मुलाटे याच्या अध्यक्षतेखाली होणार असून  २५ डिसेंबरला सकाळी १० वाजता उद्घाटन   अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते होणार आहे. तर २६ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजता आरोग्य मंत्री डॉ राजेश टोपे यांच्या हस्ते संमेलनाचा  समारोप होणार आहे. या दोन दिवसीय संमेलनात संविधान ग्रंथ दिंडी,पुस्तक प्रदर्शन,रांगोळी प्रदर्शन,पुरस्कार वितरण,३परिसंवाद, २कविसंमेलन ,कथाकथन,लोककलावंताचा लोकोत्सव,असे भरगच्च  वाड्:मयीन कार्यक्रम होणार असून समारोप सत्रात वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते करणार असल्याचे स्वागताध्यक्ष रमेश आण्णा मुळे, संयोजक डी .एन .जाधव,झेप सल्लागार डॉ.ऋषीकेश कांबळे,निमंत्रक प्रा. शिवाजी वाठोरे,श्रीमती ए. बी. साळवे,सावली राऊत,अश्विनी मनवर,प्रा.सिध्दार्थ बनसोडे, रेश्मा गरड यांनी कळविले आहे.

Previous Post Next Post