यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी/संजय कारवटकर.
राळेगाव पंचायत समिती सभापती प्रशांत तायडे यांना सह्याद्री उद्योग समूह या महाराष्ट्रातील नामांकित उद्योग समुहाकडुन दील्या जानारा राज्यकर्ता पुरस्कार 2021-22 साठी निवड करण्यात आली. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत सदर पुरस्कार हा खासदार संजय राऊत, जयंत पाटील जलसंपदा मंत्री, बाळासाहेब थोरात महसूल मंत्री, पंकजा मुंडे पालवे माजी मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत यशवंतराव चव्हाण सेंटर नरिमन पॉइंट मंत्रालयात समोर मुंबई येथे 30 जानेवारी 2022 ला दुपारी तीन वाजता वितरीत करण्यात येणार आहे . सभापती प्रशांत तायडे यांच्या पंचायत समिती व सामाजिक कार्याची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे त्याची या पुरस्कारासाठी निवड झाल्याने पंचायत समिती सर्व सभासद गण, कर्मचारी व राळेगाव तालुक्यात आनंदी वातावरण निर्माण झाले आहे