ग्रामसेवक आणि सरपंच मिलीभगत ने केली भ्रष्टाचाराची सीमापार.


 राजु भास्करे / अमरावती.

अचलपूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या येवता ग्रामपंचायत येथे पाण्याच्या टाकी खाली ब्लिचिंग पावडर पाणी शुद्ध करण्याची मशीन काही दिवसांपूर्वी लावण्यात आली. ही मशीन लावण्या मागचा उद्देश असा की पावसाळ्याच्या दिवसांमध्ये या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात घाणीच्या साम्राज्यामुळे, व पिण्याच्या दूषित पाण्यामुळे जवळपास घरोघरी सर्दी पडसे ताप ,मलेरिया ,टायफाईड ,डेंगू या विविध स्वरूपाच्या आजाराने थैमान घातले होते, या विविध आजाराला आढा बसावे म्हणून ब्लिचिंग पावडर पाणी शुद्ध करण्याची मशीन ग्रामपंचायत चा ठराव सर्वानुमते घेण्यात आला. परंतु या मशिन ची किंमत राहुल नेतनराव यांनी ऑनलाइन चेक केली असता फक्त जवळपास तीन हजार रुपये किंमत त्यांच्या निदर्शनात आली. अचलपूर तालुक्यातील ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष पदी नेतृत्व करणारे आणि येवता ग्रामपंचायतचा पदभार सांभाळणारे महाशय श्री.शरद जयसिंगपुरे यांनी महिला सरपंच यांच्यासोबत संगणमत करून चक्क तीन हजार रुपये मशीन चे बिल 69 हजार 900 रुपये काढल्याचा महा प्रताप तालुका अध्यक्ष साहेबांनी केलेला आहे. असा आरोप उपसरपंच यांनी केला आहे, गावामध्ये संपूर्ण नागरिकांमध्ये चर्चा आहे की ग्रामसेवकांनी भ्रष्टाचाराचा कळस पार केला आहे. गोरगरीब जनतेला धमकावून त्यांच्याकडून घर टॅक्स जबरदस्ती वसूल करून घेतले आहे. आणि त्या पैशावर भ्रष्टाचाराचा प्रताप रचल्या जात आहे, शरद जयसिंगपूरे यांना जनप्रतिनिधी,शासकीय, प्रशासकीय अधिकाऱ्यांची भीती नाही का असा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे?राहुल नेतनराव उपसरपंच यांनी सतत एक महिन्यापासून तक्रारीच्या माध्यमातून मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी तसेच गट विकास अधिकारी भ्रष्टाचार झाल्याची बाब निदर्शनात आणून दिली. गट विकास अधिकारी पंचायत समिती अचलपूर यांनी मशीन बाबत  भ्रष्टाचार उघड झाल्याचे पत्र श्री एम. एस. कास्‍देकर तपास अधिकारी म्हणून नियुक्ती केली. आज रोजी प्राथमिक स्वरूपात त्यांनी तक्रार करता आणि संबंधितांचे बयान नोंदविले. श्री राहुल नेतनराव उपसरपंच तक्रार करते यांनी जोपर्यंत भ्रष्टाचारी ग्रामसेवक शरद जयसिंगपुरे व सरपंच महिला यांचे निलंबन होणार नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही अशी भूमिका घेतली.. भ्रष्टाचार झाला हे उघड झालेच समजा परंतु भ्रष्टाचाराचा कळस गाठ नाऱ्यानवर कोणती कारवाई होणार याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे...

Previous Post Next Post