जळगांव जा.प्रतिनिधी:-
जळगांव जामोद तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना अधिक बळकट करण्यासाठी तसेच आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या व पंचायत समिती निवडणुकां बरोबर जळगांव जामोद नगरपालिका निवडणूक होत आहे. म्हणून पक्ष संघटन वाढविण्यासाठी तसेच राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार दिनांक १७ डिसेंबर रोजी जळगांव जामोद येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मा. श्री विठ्ठल लोखंडकार राज्य उपाध्यक्ष व बुलढाणा जिल्ह्याचे संपर्क अध्यक्ष व अकोला जिल्ह्याचे संपर्क अध्यक्ष तसेच मा.श्री मदनराजे गायकवाड जिल्हा अध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष विनोद टिकार यांच्या उपस्थितीत तसेच तालुकाध्यक्ष श्री राजू राऊत शहराध्यक्ष नागेश भटकर यांच्या उपस्थिती भव्य पक्षप्रवेश व मेळावा करण्यात आला. जळगाव जामोद येथील सर्व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनात पक्ष मेळावा व भव्य पक्षप्रवेश करण्यात आला आहे या मेळाव्यामध्ये मा.श्री.विठ्ठलभाऊ लोखंडकार राज्य उपाध्यक्ष व मा.श्री.मदन राजे गायकवाड यांच्या हस्ते पक्षप्रवेश करण्यात आले आहे व तसेच सर्वांना सन्माननीय राज साहेब ठाकरे यांचे मार्गदर्शन करण्यात आले आहे यावेळी मोठ्या संख्येने मनसे पदाधिकारी .यावेळी उपस्थित अमोल म्हसाळ , तालुका उपाध्यक्ष संजय कोथळकर शहर उपाध्यक्ष, गोपाल वानखडे शहर उपाध्यक्ष,भागवतभाऊ उगले तालुकाध्यक्ष नंदुरा, सागर जगदाळे शहराध्यक्ष नांदुरा, भास्करभाऊ चौरे, शिवाभाऊ खोंड तालुकाध्यक्ष संग्रामपूर, डॉक्टर अधिकारी, अध्यक्ष योगेश म्हसाळ, शाखाध्यक्ष वैभव येनकार, शहर ससचिव कुणाल तायडे, शहर संघटक आकाश कपले तालुका उपाध्यक्ष, धनंजय जाधव शहर सोशल मीडिया, आकाश मानकर ,दीपक इंगळे, सदाशिव पवार,दिनेश वसतकार,अतुल इंगळे अमित शिंदे अरुण काळंगे अक्षय मानकर ,गणेश कातोरे,यांच्यासह बहुसंख्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. तसेच या मेळाव्यामध्ये नवीन पिढी मधील युवकांनी पक्ष प्रवेश करण्यात आला आहे.त्यामध्ये जळगांव शहरातील सौ शितल म्हसाळ,दीपक चिंचोळकर ,सागर अग्रवाल, अमोल हागे,अमोल ताडे, अरुण साळुंखे, रोहित वानखडे ,दीपक सातव, विजय सोनटक्के मंगेश ,वानखडे उमेश वानखडे ,आनंद तायडे आनंद सपकाळ, धीरज जुमळे,अमोल माठे, आशिष गायकी, निखील वानखडे, विवेक वानखडे, धीरज इंगळे यांनी पक्ष प्रवेश केला.तसेच यावेळी पक्ष वाढविण्यासाठी मनसेचे राज्य उपाध्यक्ष विठ्ठल लोखंडकार मनसे चे जिल्हाध्यक्ष मदनराजे गायकवाड यांनी मार्गदर्शन बोलताना मदनराजे गायकवाड यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे विचार सर्वांसमोर मांडून सर्वांना प्रणित करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व आगामी होणाऱ्या जळगाव जामोद नगरपरिषद लढविण्यासाठी सर्वांना पाठबळ देऊन प्रत्येक वॉर्डांमध्ये मनसेचे उमेदवार उभे राहतील अशी सन्माननीय श्री विठ्ठलभाऊ लोखंडकार माननीय श्री मदनराजे गायकवाड बुलढाणा जिल्हा अध्यक्ष यांनी यावेळी बोलताना घोषणा केली. तसेच जळगाव जा शहरामध्ये महिला शहराध्यक्ष पदी सौ शितल ताई म्हसाळ यांची नियुक्ती करण्यात आली.