संजय कारवटकर यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव नगर पंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षानी जोरदार आघाडी घेतली आहे.राळेगाव नगर पंचायत ची निवडणूक दि.21 डिसेंबर रोजी होणार आहे तर निकाल 22 डिसेंबर ला घोषित होणार आहे.मात्र राळेगाव नगर पंचायत निवडणुकीत जोरदार रस्सीखेच सुरू आहे या निवडणुकीत काँग्रेस,भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पुर्णपणे ताकतीने निवडणुकीत उतरली आहे.तरी पण ओ.बी.सी. आरक्षणामुळे सर्व पक्षांची निराशा झाली आहे.राळेगाव नगर पंचायत मध्ये 17 वाड आहे ओ.बी.सी. आरक्षणामुळे तीन वाडातील निवडणुक थांबली आहे मात्र 14 वाडातील निवडणुक जोरदारपणे रंग भरला आहे त्यातल्या त्यात काँग्रेस पक्षानी जोरदार मुसंडी मारल्याची चर्चा संपुर्ण राळेगाव व राळेगाव तालुक्यात दिसत आहे हे मात्र विशेष