बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी/सुरज देशमुख R.C24 न्युज.
राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु असून आज 45 व्या दिवशीही या आंदोलनामध्ये तोडगा निघालेला नाही यामुळे एसटी प्रशासन सतर्क आहे. यामुळे आज शेगाव आगारातील एसटी बसेस बुलढाणा येथे आरटीओ पासिंग साठी पाठवीत असताना कुठलीही अनुचित घटना होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्तात पाठवण्यात आल्या... एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बंदमुळे राज्यासह बुलढाणा जिल्ह्यातील सर्वच एसटी आगार मधून प्रवासी वाहतूक बंद आहे. मोजक्या ठिकाणावरून पोलिस बंदोबस्त मध्ये प्रवासी वाहतूक सुरू असताना आज बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव एसटी आगारातून ८ बसेस आरटीओ पासिंग साठी पाठविणे गरजेचे असल्याने पोलिस प्रशासनाच्या बंदोबस्तामध्ये सदर ८ ही एसटी बसेस बुलढाणा करीता रवाना करण्यात आल्या.