पेंशन मार्च आंदोलन कर्ते आणि पोलिस यांच्यात ठाणे येथे धुमश्चक्री...


 संजय कारवटकर यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी

21 डिसेंम्बर पासून पडघा कल्याण  येथून मंत्रालयांच्या दिशेने निघालेला पेंशन मार्च45 km चालून ठाणे येथे काल पोहचला होता.तेव्हा आंदोलन कर्त्याची पोलिसांनी मुलुंडच्या जुन्या चेक नाक्यावर संध्याकाळी ६ वाजता नाकेबंदी केली होती. आज २४ डिसेंम्बर रोजी ११ वाजता आंदोलन कर्ते जेव्हा मंत्रालयाच्या दिशेने निघण्यासाठी निघाले. तेव्हा पोलिसांनी बँरीकेट लावून पेन्शन फायटर आंदोलन कर्त्याना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ५०० पोलिसांचा ताफा तैनात होता. आंदोलन कर्ते आणि पोलीस यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. आंदोलन कर्ते अत्यंत  शिस्तबद्ध अहिंसात्मक मार्गाने पेन्शन मार्च चालुन जाण्याच्या निर्धाराने पुढे चालत निघाल्याने पोलिसांनी आंदोलन कर्त्यांना अटक करुन नवघर पोलिस ठाणे येथे डांबून ठेवले. तब्बल१५० कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली. २००५ नंतरच्या सर्व विभागाच्या कर्मचा-यांना जुनीच पेन्शन लागू करावी  या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय समिती ठाम आहे.पेन्शन मिळेपर्यंत आंदोलन चालूच राहील हा निर्धार येथे व्यक्त करण्यात आला. मयत कर्मचा-यांच्या कुटूंबाला न्याय मिळेपर्यंत संघर्ष चालू च राहील.या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा कार्यकारणी यवतमाळ आणि तालुका कार्यकारणी राळेगाव यांनी या घटनेचा निषेधार्थ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.उद्धव जी ठाकरे यांना मा जिल्हाधिकारी आणि उप विभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन सादर करण्यात आले.

Previous Post Next Post