20 वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या.. पतीसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल. जलंब पो. स्टे हद्दीतील घटना...


 बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सुरज देशमुख.R.C24 न्युज

पतीसह सासरकडील मंडळीने लग्नात हुंडा दिला नाही या सह विविध कारणांनी शारिरीक व मानसिक छळ केला. त्यामुळे या जाचाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना जलंब पो.स्टे.अंतग॔त येणाऱ्या कठोरा येथे घडली. याबाबत वृत्त असे कि मृतक विवाहितेचे वडील देविदास पांडुरंग राजुस्कार वय 55 वष॔ यांनी जलंब पो.स्टे.ला तक्रार दिली कि त्यांची मुलगी सौ.मेघा पवन वाघ वय 20 वष॔ हिचा विवाह एक वर्षापूर्वी कठोरा येथील पवन सुभाष वाघ यांचेसोबत झाला होता. लग्न झाल्यानंतर सासरच्या मंडळीने सुरुवातीला तिला चांगली वागणूक दिली. मात्र काही महिने उलटून गेल्यानंतर तुला रवयपांक येत नाहीत, तुझ्या वडिलांनी लग्नात हुंडा दिला नाही, तुला शेतीची कामे येत नाही,    तू जेवण जास्त करते या कारणावरून सौ.मेघा हिचा पती पवन सुभाष वाघ, सासरा सुभाष सापुडा वाघ, सासु सौ.महानंदा सुभाष वाघ व देर गणेश सुभाष वाघ हे सर्व सतत शारिरीक व मानसिक छळ करीत होते. त्यामुळे या सर्वांच्या जाचाला कंटाळून सौ. मेघा वाघ हिने काल दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. अशा तक्रारीवरून पोलिसांनी उपरोक्त चौघांविरुद्ध कलम 304 ब , 306, 498अ 34 भादंवी नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पीएसआय राहुल कातकाडे हे करित आहे.

Previous Post Next Post