राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी.
चिखलदरा तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल गौलखेडा बाजार येथिल मुख्याध्यापक देवेंद्र ठाकरे सर यांची काही महिन्यांपूर्वी अमरावती जिल्ह्य़ातील नांदगाव पेठ येथे बदली झाली आहे. त्याच अनुषंगाने मुख्याध्यापक देवेंद्र ठाकरे सर यांना समाज कल्याण सभापती दयाराम काळे यांच्या उपस्थितीत दि. 20/1/2022ला ठाकरे सरांचा सत्कार घेण्यात आले आहे. तसेच ताठे सर यांचा पण सत्कार घेण्यात आले आहे.सत्काराच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून सरपंच अल्केश महल्ले, केद्रप्रमुख सविता भास्करे, ग्रामपंचायत सचिव सुधीर भागवत, विनायक येवले, आकाश जयस्वाल, श्रीराम मावस्कर, मनिराम दहीकर, हे होते.तसेच शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक म्हणून एम. एम. राउत, एस. बि. डांगे, आर. एस इंगळे, विघ्ने मॅडम, फुटाणे मॅडम, साबळे मॅडम, हनवते मॅडम. भागवतकर सर.,गांवडे बाबू, श्रीमती जवजांळ हे होते.