राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी
उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ अहिराणी भाषा सावंर्धन तर्फे येत्या 22 ते 24 जानेवारी दरम्यान होणारे आनलाईन विश्व् अहिराणी संमेलन लाखो लोक बघणार आहेत.संमेलनात नाट्य नृत्य,वन वही, गायन असे विविध प्रकार प्रेक्षकांना पहाव्यास मिळणार आहे. या संमेलमध्ये मेळघाट मधून हजारो गवळी भाषिक सहभागी होणार आहेत.मेळघाट मधील गवळी समाज हजारो वर्षांपासून या ठीकांनी राहत आहे. आणि या समाजाची भाषा ही अहिराणी भाषेशी मिळती जुळती असून शुद्ध अहिराणी असल्याच भास होतो.
त्यामुळे अहिराणी संमेलणासाठी मेळघाट मधील गवळी भाषिक युवक व साहित्यिक सहभागी होण्यासाठी उत्सुक आहेत2020 मध्ये झालेल्या विश्व् अहिराणी संमेलमध्ये दहा लाख अहिराणी भाषिककानी हजेरी लावली होती यावर्षी पंचवीस लाख भाषिक सहभागी होण्याचा ध्येय गाठण्याचा अंदाज आयोजकांनी ठेवला आहे.