राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी.
धारणी तालुक्यातील हरिसाल येथील आदिवासी विकास महामंडळाचे अधिकृत मका खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना नाहक त्रास दिल्या जात होते त्याविरुद्ध माजी जि प सदस्य सदाशिवराव खडके यांनी आंदोलन छेडले होते. ते स्वतः उपोषणाला बसले होते त्यानंतर शेतकऱ्यांचा मका खरेदीला प्रारंभ झाला आहे.हरिसाल येथील आदिवासी विकास महांडळाच्या मका खरेदी केंद्रावर आदिवासी शेतकऱ्यांना नाहक त्रास दिल्या जात होता. डबल चाळणी मारून आणा असे सांगून परत पाठविले जात होता. त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक भाडे व त्रास होत होता त्याविरुद्ध माजी जि. प. सदस्य व शेतकरी सदाशिवराव खडके यांनी आंदोलन छेडले होते याची दखल घेत मका खरेदी केंद्र सुरू करण्यात आले व याठिकाणी मका खरेदी सुरू झाली.