धारणी येथे जि.प. बांधकाम उपविभाग चे विश्राम गृह आदिवासी भवन येथे राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेशची सभा कोरोनाचे नियम पाळून सामाजिक अंतर ठेऊन संपन्न झाली.राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेश चे जिल्हाध्यक्ष नितेश किल्लेदार व राष्ट्रीय महासचिव पवन बैस, राष्ट्रीय कार्यकारिणी उपाध्यक्ष राजू भास्करे यांच्या प्रमुख उपस्थितीत व धारणीचे जेष्ठ पत्रकार सुखदेव अंभोरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य पत्रकार परिषदेची सभा संपन्न झाली. सदर सभेमध्ये धारणी येथील राज्य पत्रकार परिषदेमध्ये मेळघाट पत्रकार संघ समाविष्ट करण्याचे ठरले,असून सर्वानुमते ठरले. राज्य मराठी पत्रकार परिषद ही संघटना पत्रकाराच्या हक्कासाठी लढणारी संघटना असल्याचे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष किल्लेदार यांनी केले.तसेच पत्रकार कसा असावा याबाबत माहिती दिली. पत्रकार निर्भीड व निष्पक्ष असावा असेही त्यांनी सांगितले.सोबतच पवन बैस यांनी फेब्रुवारी महिन्यात चिखलदरा येथे होणाऱ्या राज्यधिवेशनाबाबत ची माहिती दिली. तसेच या अधिवेशनात जीवन गौरव व नवरत्न दर्पण पुरस्कार एकूण नऊ लोकांना महाराष्ट्रतून दिले जातात. त्या पैकी तीन पुरस्कार मेळघाट मध्ये नवरत्न मेळघाट दर्पण देणार असल्याची माहिती दिली.सोबच राजूभाऊ भास्करे यांनी संघटनेची माहिती दिली. व आपले अनुभव कथन केले.त्यानंतर धारणीचे ज्येष्ठ पत्रकार रवी नवलाखे यांनी पत्रकारांच्या अंगी कोणते गुण असावे याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार सुखदेव अंभोरे यांनी आपले अनुभव कथन केले.पत्रकारिता करताना येणाऱ्या अडचणी बाबत माहिती दिली.कार्यक्रमाचे संचालन पत्रकार ज्ञानदेव येवले यांनी केले तर आभार प्रदर्शन सुरज मालवीय यांनी केले.सदर सभेमध्ये राजू यादव, सुंदर यादव, गजू सुडस्कार, ज्ञानदेव येवले, दीपक मालवीय,सुरज मालवीय, मोनू मालवीय, सुनिल लाखपती, डॉ. चंद्र्विजय अनासने,जेष्ठ पत्रकार सुखदेव अंभोरे, इत्यादी पत्रकार मंडळी उपस्थित होती.
राज्य मराठी पत्रकार परिषदेची धारणीत बैठक संपन्न..
राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी