कसाईखेडा येथे वनविभागाच्या पुढाकारणे कोविड लसीकरण संपन्न...


 राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी 

धारणी तालुक्यातील अतिदुर्गम बैरागड आरोग्य विभाग अंतर्गत उत्तर पाडीदम बीट मधील कसाईखेडा या गावांमध्ये कोरोना लसीकरणाचे आयोजन करण्यात आले.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतर्गत सुरु असलेल्या कामावरील मजुराणा लसीकरनाचे महत्व सांगून काम थांबवून लसीकरण करण्याचे नियोजन आरोग्य विभागाशी समन्वय साधून वनपरीक्षेत्राधिकारी धारणी प्रादेशिक यांच्या मार्गदर्शनाखाली वर्तुळ अधिकारी श्री. पारलीवर यांनी केले.अतिदुर्गम भागामध्ये आदिवासी बांधव लसीकरण करण्यासाठी भीत असल्याने त्यांच्यामधील भीती वनविभागाने दूर करून लसीकरण   पूर्ण केले.सदर कार्यक्रमांमध्ये बैरागड वर्तुळ अधिकारी श्री डी.एन. पारलेवार  बीट वनरक्षक श्री सी.एच. थोटे, ग्रामपंचायत सदस्य श्री रामसिंग जावरकर व बैरागड आरोग्य विभाग टीम उपस्थित होती. सदर कार्यक्रमांमध्ये कोरोना लसीकरण बाबत जनजागृती करून गावातील रोजगार हमी योजना वरील मजुरांना लस घेण्यास प्रोत्साहित करण्यात आले.

Previous Post Next Post