महाराष्ट्रात, बहुचर्चित, महिला, वनविभागाच्या आर, एफ ओ, श्रीमती दिपाली चव्हाण, आत्महत्या प्रकरण, संपूर्ण मेलघाठ,सह, राज्यात, गाजले होते, अजूनही दीपाली चव्हाण यांच्या, आठवणी नागरिकांच्या स्मरणात आहेत, हरिसाल येथे, स्वतःवर गोळी बार करून जीवन संपणाऱ्या, दीपाली चव्हाण, त्यांच्या आत्म्याला अजूनही शांती मिळाली नसल्याचे, बोलले जात आहे, या प्रकरणात दोष आरोपपत्र, फॉरेस्ट विभागाचे, अधिकारी, d.f.o. चिखलदरा, यांच्यावर गुन्हे नोंदवून, कारवाई करण्यात आली होती, सोबतच अमरावती, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक, तथा, क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अधिकारी श्री एम एस रेड्डी, यांच्यावर आत्महत्येप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते, या गुन्ह्यात त्यांना अटक सुद्धा झाली होती.एम एस रेड्डी, हे मेलघाट मध्ये कार्यरत असताना, अनेक शासकीय कार्यालयात उद्घाटनाच्या, वेळी, त्यांच्या नावाच्या स्पष्ट अक्षरात, नीर दर्शनास येणाऱ्या ठिकाणी पाट्या लावण्यात आल्या होत्या, दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्ये नंतर, त्यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आल्याचे समजते परंतु अजूनही त्यांचा दबदबा भीती, मेळघाटच्या अधिकाऱ्यांच्या मनातून गेलीले नसल्याचे दिसून आले, अनेक इमारतीवर अजूनही एम एस रेड्डी उद्घाटन प्रसंगाच्या पाट्या, आपल्या, सामान्य नागरिकांच्या डोळ्याने दिसत आहे, परतवाडा येथे एका इमारती समोर, भव्य अशी पाटी दिसल्याचे,लक्षात आले की अजूनही रेड्डी परतवाडा अमरावती येथील कारभार सांभाळतात की काय असा मनात प्रश्न निर्माण झाल्याचे वाटत होती.याच इमारतीमध्ये माननीय जिल्हाधिकारी नवनीत कोर, यांची सुद्धा भेट या ठिकाणाला झाली होती, सोबतच अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ठिकाणाला भेटी दिल्या तर या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नजरेत आरोपात असलेले अधिकारी यांच्या नावाची पाटी लक्षात येत नाही का, असा प्रश्न नागरिकांनी केलेला आहे.आमच्या प्रतिनिधीने या विभागाच्या कार्यालयाची पाहणी केली असता, बऱ्याच ठिकाणी एम एस रेड्डी यांच्या नावाच्या बोर्ड लावलेले दिसले.यावरून असाही प्रश्न निर्माण झाला की, अजूनही येथील अधिकारी, आरोपात असलेल्या,अधिकाऱ्यांच्या नावाच्या पाट्या का काढत नाहीत हा खरा प्रश्न नागरिकांसमोर उभा झालेला आहे आहे, आता तरी ह्या पाट्या काढल्या जातील काय या कडे जनतेचे लक्ष लागले आहे
फॉरेस्ट विभागाचे वरिष्ठ, अधिकाऱ्यांचे आंधळ्याचे सोंग..दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणातील आरोपी च्या नावाच्या पाट्या, शासकीय इमारतीवर जशाच्या तशाच?
राजु भास्करे /गौलखेडा बाजार