सन्मान पत्रकारांचा सन्मान लोकशाहीचा. पत्रकार दिनानिमित्त करण्यात आला पत्रकारांचा सन्मान...


 जळगांव जा.प्रतिनिधी:-

लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकार बांधवांचा सहा जानेवारी रोजी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती दिनी पत्रकार दिन साजरा करण्यात येत असतो. सद्गुरु बनाना रायपनिंग चेंबर जळगाव जामोद येथे दिनांक 6 जानेवारी रोजी पत्रकार दिनानिमित्त दिनांक 7 रोजी तालुका काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष अविनाश उमरकर व शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अर्जुन घोलप यांच्यासह सेवादल चे जिल्हा उपाध्यक्ष श्रीकृष्ण उर्फ शिरूभाऊ केदार यांनी पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकार बांधवांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता. यावेळी सर्व पत्रकार बांधवांना पेन डायरी कॅलेंडर अशा भेटवस्तू उपहार दिल्या व सर्व पत्रकार बांधवांना मनसोक्त जेवण सुद्धा दिले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अविनाश उमरकर तर प्रमुख अतिथी म्हणून अर्जुन घोलप श्रीकृष्ण केदार ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू भगत अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष कैलासबापू देशमुख, गुलाबराव इंगळे, हे होते सदर कार्यक्रमाच्या वेळी सर्वप्रथम मान्यवरांनी यथोचित आपले मनोगत या वेळी व्यक्त केले. सदर कार्यक्रमाला जळगाव जामोद तालुक्यातील जयदेव वानखडे,भीमराव पाटील,विनोद चिपडे, विजय पोहनकर,देविदास तायडे, राजेश बाठे, राजकुमार भड, राजेश लहासे, अनिल भगत,मंगेश राजनकार, गणेश भड, अश्विन राजपूत गजानन खिरोडकार, फारुक शेख, राजू वाडे, राहुल निर्मळ योगेश मिसाळ अमोल भगत राहुल ताठे विठ्ठल गावंडे संतोष कुलथे विजय वानखडे शिवदास सोनवणे संजय दांडगे यांच्यासह बहुसंख्य पत्रकार बांधवांचा यावेळी भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. तसेच यावेळी श्रीकृष्ण केदार यांना त्यांच्या विमा व्यवसायामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचा 2022 चा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकृष्ण केदार यांनी केले तर आभार प्रदर्शन अर्जुन घोलप यांनी केले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रज्वल घोलप,प्रवीण वंडाळे, राजू काळपांडे राजू ताडे इत्यादींनी सहकार्य केले.

Previous Post Next Post