राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत बी एस पटेल महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक यांना सुवर्ण...


जळगांव जा.प्रतिनिधी:-

राज्यस्तरीय मास्टर्स अथलेटिक्स स्पर्धा कृषी विद्यापीठाचे मैदान अकोला येथे दिनांक सहा जानेवारी ते आठ जानेवारी दोन हजार बावीस दरम्यान पार पडल्या. या स्पर्धेमध्ये बापूमिया सिराजोद्दीन पटेल कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा डॉ बाबाराव सांगळे यांनी (वॉकिंग) चालण्याच्या स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकाविले त्यांनी ही स्पर्धा तीस मिनिट 40 सेकंदात पूर्ण केली तसेच त्यांच्या पत्नी सौ वर्षा बाबाराव सांगळे यांनी चालण्याच्या स्पर्धेमध्ये व पंधराशे मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळविले त्यांची निवड हैदराबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी झालेली आहे, या स्पर्धेमध्ये रनिंग, जम्पिंग आणि थ्रोविंग इत्यादी खेळांचा समावेश होता व महाराष्ट्रभरातून वयोगट 30 वर्षावरील सहाशे महिला व पुरुष खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. त्यांच्या यशाचे कौतुक महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष ॲड सलीम पटेल, संचालक कय्युम पटेल, सहसचिव रब्बानी देशमुख, सिराजोद्दीन भाई पटेल, प्राचार्य डॉ आई ए राजा महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.

Previous Post Next Post