श्री लखाजी महाराज विद्यालयात पंधरा ते अठरा वर्षे वयोगटातील १६३ विद्यार्थ्यांनी घेतले लसिकरण..


 यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी  संजय कारवटकर

यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथील श्री लखाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आज दिनांक ४/१/२०२२ रोज मंगळवारला व दिनांक ५/१/२०२२ रोज बुधवारला पंधरा ते अठरा वर्षे  वयोगटातील २३९ पैकी १६३ विद्यार्थ्यांचे लसिकरण करण्यात आले. सर्व प्रथम विद्यालयाचे प्राचार्य विलासजी निमरड सर व जेष्ठ शिक्षक श्रावनसिंग वडते सर यांच्या उपस्थितीत एका विद्यार्थ्यांला लस टोचून सुरवात करण्यात आली त्यानंतर ईतर विदयार्थ्याना लस लस देण्यात आली.त्यामध्ये २३९ विदयार्थ्यापैकी १६३ विदयार्थ्यांनी लसीचा लाभ  घेतला त्यावेळी आरोग्य खात्याचे आरोग्य पर्यवेक्षक अभिलाष निमरड,आरोग्य सेविका सौ एस पी जिवतोडे,गट प्रवर्तक  विद्या पटेलपैक,आशा वर्कर सौ संगिता पाल, सौ वैशाली चादेंकर यांची उपस्थिती होती. हा लसीचा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक  रमेश टेभेंकर,दिगाबंर बातुलवार, सौ कुंदा काळे,प्राध्यापक रंजय चौधरी,सौ वंदना वाढोणकर,राजेश भोयर,स्वाती नैताम,मोहन आत्राम, मोहन बोरकर, कु वैशाली सातारकर,विशाल मस्के,तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी वाल्मिक कोल्हे,पवन गिरी,शुभम मेश्राम,बाबुलाल येसंबरे यांचे सहकार्य लाभले.

Previous Post Next Post