श्री योग वेदांत सेवा समिती जळगाव जामोद तर्फे जय श्रीराम आश्रम येथील निवासी विद्यार्थ्यांना ब्लॅंकेट,टोपी यांचे वाटप..


जळगांव जा.प्रतिनिधी:-

अकोला खुर्द येथील जय श्रीराम आश्रम येथे परम पूज्य संत श्री आसारामजी बापू यांच्या प्रेरणेने श्री.योग वेदांत सेवा समिती जळगाव जामोद तर्फे आश्रमातील निवासी 50 विद्यार्थ्यांना सध्या कडक थंडी पासून जपण्याकरिता ब्लॅंकेट्स आणि डोक्यातील टोप्यांचे निशुल्क वितरण करण्यात आले . जय श्रीराम आश्रम येथे जवळपास बाहेरगावातून 40 च्या वर निवासी  विद्यार्थीअसून ते शिक्षण घेत आहेत.बहुतांश विद्यार्थी हे गरजू असून आश्रमाच्या माध्यमातून आध्यात्मिक,नैतिक आणि सांस्कृतिक शिक्षणासोबत वैदिक गणित,संस्कृत विषया सह इतर विषयांचे सह सखोल मार्गदर्शन आदरणीय पुरुषोत्तम बावस्कार  हे करीत असून उज्वल विद्यार्थी घडत आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी पुरुषोत्तम  महाराज बावस्कार होते.तर कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता श्री.योग वेदांत सेवा समिती जळगांव जामोद चे के.ओ.इंगळे सर,वाय.पी.वाघ सर, केशव करांगळे , अभिनव गायकी यांनी परिश्रम घेतले.

Previous Post Next Post