तामगांव ची शेतकरी कन्या इंद्रायणी गोमासे बनली गोंदिया ची तहसीलदार...


 बुलढाणा जिल्हा विशेष प्रतिनिधी:-अनिल भगत.

बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यामध्ये येत असलेल्या तामगाव ची कन्या व सोनाळा येथील सून असलेली इंद्रायणी गोमासे (इंगळे) दिनांक 17 जानेवारी रोजी गोंदिया  तहसीलदार म्हणून रुजू झाली आहे .शेतकरी कुटुंबात जन्मलेली आणि वेगळं काही तरी करण्याची इचछा बाळगणाऱ्या संग्रामपूर तालुक्यातील तामगाव येथील अल्पभूधारक शेतकऱ्यांची कन्या आणि पती देशाची सेवा करीत असणाऱ्या कुटुंबातील असून  तिचा विवाह सोनाळा येथील इंगळे परिवारातून सासरच्या लोकांनी सुद्धा तिचे शिक्षणाला विरोध न करता शिक्षण सुरू ठेवले व ती राज्यसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन तहसीलदार झाली , तिला शासनाकडून तहसीलदारपदी रुजू होण्याचे आदेश आल्यावरून गोंदिया तहसील कार्यालयात सोमवारी परिविक्षाधीन  तहसीलदार म्हणून रुजू झाली आहे.इंद्रायणीचे माहेरचे आडनावं गोमासे असून  वडील मुरलीधर गोमासे तामगाव येथील अल्पभूधारक शेतकरी आहे या परिस्थितीत मात करून तिने यश मिळविले. बीएससी प्रथम वर्षांत असतांना इंद्रायणीचा विवाह सोनाळ्याचा इंगळे परिवारातील केंद्रीय पोलीस दलातील जवान विजय इंगळे यांच्या सोबत झाले.पण लग्न झाल्यावरही इंद्रायणी यांनी शिक्षण पूर्ण करून इंद्रायणी ने यशाचं शिखर गाठलं. वडिलांकडे फक्त तीन एकर जमीन. त्यात तीन बहिणी आणि एका भावाच्या शिक्षणाचं ओझं, मात्र इंद्रायणी यांच्या वडिलांनी मुलींचं शिक्षण थांबवलं नाही. शेती पिकवून त्यांनी मुलींचं शिक्षण व लग्न केले.इंद्रायणी यांच्या पती सीआरपीएफमध्ये असून देशाची सेवा करत आहेत. बाकी परिवार शेतकरी असल्यावरही, सासरच्यांनी त्यांचा शिक्षणाला विरोध न करता शिक्षण सुरूच ठेवलं. याच फलित म्हणजे इंद्रायणी यांनी कृषी पदविकेत 10 पुरस्कार पटकावले. यात 5 सूवर्ण, 2 रजत तर 3 रोख पुरस्कार आहेत.सातपुड्याच्या पायथ्याशी ग्रामीण भागातील एक कन्या असलेल्या इंद्रायणीने यश मिळवल्याने तिचे संग्रामपूर तालुक्यासह जिल्हाभरात अभिनंदन व कौतुक होत आहे.

Previous Post Next Post