संग्रामपूर ता.प्रतिनिधी:-
संग्रामपूर तालुक्यातील एका 50 वर्षीय महिलेचा विनयभंग झाल्याची घटना 16 जानेवारी रोजी घडली असून सोनाळा पोलिस स्टेशनला आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पिडित महिलेने पोस्टे ला दिलेल्या तक्रारीनुसार टुनकी येथील रहिवासी सुभाष शालीकराम चांदुरकार वय 67 वर्ष याने सदर महिलेच्या घरासमार टपरी लावली आहे. 16 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास सदर महिलेने त्याला टपरी काढण्याकरीता सांगितले असता त्याने टपरी उचलणार नाही, तुझ्याकडून काय होते ते करून घे असे बोलून शिविगाळ केली. तसेच सदर महिलेस लज्जा निर्माण होईल असे कृत्य करून विनयभंग केला व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. महिलेच्या तक्रारीवरून सोनाळा पोलिसांनी उपरोक्त आरोपीविरूध्द कलम 354 ( ब ) 323 , 504 , 506 भादंवि नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सोनाला पोलिस स्टेशनचे ठाणेेेदार श्रीधर गुट्टे यांच्याा मार्गदर्शनाखाली नापोकाँ मोहन पवार करीत आहेत.