जळगांव जा.प्रतिनिधी:-
आसलगाव येथील रहिवासी असलेले पत्रकार राहुल निर्मळ यांनी दिनांक 17 जानेवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालयाला जनरल निधी ची अफरातफर झाल्याबाबत खुलासा देण्यात यावा अशा आशयाचे लेखी पत्र ग्रामपंचायत ला देण्यात आले आहे. ग्रामपंचायत मधील जनरल फंडामध्ये 54 हजार रुपयांचा चेक ग्रामपंचायत सचिव सरपंच संगनमताने आपल्याजवळील व्यक्तीला कामाच्या बहाने दाखवून परस्पर अफरातफर झाला अशी आसलगाव ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू असल्याकारणाने त्यानुसार पत्रकार राहुल निर्मळ यांनी ग्रामपंचायत सदस्य यांना विचारणा केली असता त्यांनाही तो उत्तरे देता आलेली नाहीत सदर जनरल फंडामध्ये जमा होणारा पैसा हा ग्रामपंचायत विकासाचा फार मोठा भाग असून तो विकासाचा भाग सरपंच आणि सचिवाने स्वतःच्या स्वार्थासाठी गावाचा विकास बाजूला ठेवून जनतेची फसवणूक करीत त्या निधीची अफरातफर केल्याची गावात चर्चा आहे. एक नागरिक या नात्याने आपल्या ग्रामपंचायतीचे माहिती नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी चे प्रोसिडिंग बुक कॅश बुक यांच्या झेरॉक्स प्रती देऊन सदर ग्रामपंचायत मध्ये जनरल निधीची अफरातफर झाली अथवा नाही याचा खुलासा करण्यात यावा अशा आशयाचा अर्ज ग्रामपंचायतला पत्रकार राहुल निर्मळ यांनी दिला आहे सदर ग्रामपंचायत ने याचा खुलासा करून सत्य काय ते बाहेर आणावे.