हिवरखेड प्रतिनिधी:-प्रशांत भोपळे.
हिवरखेड देवळीवेसच्या मागे माँ वळखेन देवी संस्थानजवळ असलेल्या गजानन पवार यांना काही दिवसांअगोदर धार्मिक सांप्रदायी याच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झाला होता , त्यानिमित्त १५ जानेवारीला त्याच्या निवासस्थानी ह,भ,प,रामकृष्ण पाचपोर महाराज यांचे कीर्तन पार पाळून उपस्थित असलेल्या पाहुण्यांनच्या हस्ते गजानन पवार यांचा सन्मान करण्यात आला तर त्याची साखर तुला सुद्धा करण्यात आली, यावेळी उपस्थित ह,भ, प, श्री रामकृष्ण महाराज पाचपोर, बालकीर्तनकार श्री कृष्णा महाराज सदाफळे, पवन महाराज सोनोने, वनिताताई वाकोडे, पुरुषतम गावंडे, महेंद्र भोपळे, राधेश्याम सोनोने, रवी कराळे, प्रा, संतोष राऊत, अर्जुन खिरोडकर तसेच सहदेवराव भोपळे विद्यालयाचे शिक्षक होते,