भारतीय नारी रक्षा संघटना शाखा राळेगाव व क्रीडा भारती यवतमाळ शाखा भारतीय नारी रक्षा संघटना शाखा राळेगाव,यांच्या कडून मार्गदर्शन शिबीराचे आयोजन...


 संजय कारवटकर यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी

 यवतमाळ शाखा,नशा बंदी मंडळ तर्फे आयोजित निर्भय महिला सक्षम महिला या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन मार्कंडेय पब्लिक स्कूल बरडगाव, श्री महावीर कॉन्व्हेंट राळेगाव, आणि प्रथम एज्युकेशन फाउंडेशन येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात महिलांना, मुलींना, विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना आणि ग्रामीण भागातून ज्या विद्यार्थीनी येणं-जाणं करतात त्या विद्यार्थिनींसाठी आयोजन करण्याचे मुख्य कारण होते. या शिबिरात मुलींना स्वतःच्या आत्मरक्षण कसे करायचे हे मुख्य स्वरूपात शिकवण्यात आले. शिबिरात मुख्यतः मुलींना अडचणीच्या स्थितीत सर्वप्रथम काय करायला हवे, परिस्थितीनुरूप कसे वागायला हवे, आपल्याकडे जे वस्तू आहे त्याच्या आपण स्वतःच्या रक्षणासाठी शस्त्र म्हणून कसे वापरू शकतो याचे परिपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले. त्यात शाळकरी विद्यार्थिनींना पेन्सिल, पेन, शाळेचे ओळखपत्र, आधार कार्ड, हातातला कडा, बांगडी, डोक्याची पिन, पुस्तक, बॉटल या सगळ्यांचे अडचणीच्या स्थितीत शस्त्र म्हणून कसे वापर करण्यात येईल याचे मार्गदर्शन तसेच प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले आणि त्या नंतर मुलां कडून व्यसनमुक्तीची शपथ देखील वाचून घेण्यात आली. प्रथम एजूकेशन फाउंडेशन येथे सेंटरचे परिपूर्ण माहिती घेत त्यात ग्रामीण मुलांना शैक्षणिक शुल्क न घेता हॉस्पिटलीटी, ऑटोमोटिव्ह, हेल्थ केअर, इलेक्ट्रिकल, ब्युटी पार्लर, यासारखे कोर्सेस नोकरीची पूर्ण हमी देत शिकविले जातात. यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून क्रीडा भारती विदर्भ प्रांत सहमंत्री कु. सुनिताताई मौंदेकर आले होते, त्याबरोबरच भारतीय नारी रक्षा संघटना च्या जिल्हाअध्यक्षा - श्रीमती. मीराताई फडणीस, सोबतच भारतीय नारी रक्षा संघटनेचे राळेगाव तालुकाअध्यक्षा - सौ. संतोषीताई राजजी वर्मा, संकल्प व्यसनमुक्ती फाउंडेशन जिल्हा संघटक - सौ. रोशनीताई कामडी, क्रीडा भारती प्रांत महिला प्रमुख - सौ. मनीषाताई आकरे आणि आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू तसेच हॉकीचे मुख्य कोच सौ. श्रुतीताई कोलवाडकर या उपस्थित होते. या तिन्ही संस्थांनी महिलांसाठी जे निर्भय महिला सक्षम महिला शिबिर होते त्याच्या आयोजनाकरिता जे अमूल्य सहकार्य केले त्याकरिता मार्कंडेय पब्लिक स्कूल बरडगाव चे सौ. शितलताई कोकुलवार, संतोषभाऊ कोकुलवार, कुलदीप वाघमारे सर, कडू सर, काकडे सर,ईंदिरा मॅडम, सोनेकर मॅडम, तसेच श्री महावीर कॉन्व्हेंट राळेगाव चे अध्यक्ष श्री मोहनलाल जी गुंदेचा सर, प्राध्यापिका सौ.कोमेदवार मॅडम, संगीताताई खेडेकार मॅडम, सौ.ईंगोले मॅडम,चव्हानताई,तसेच प्रथम एज्युकेशन फाउंडेशन चे क्लस्टर हेड आशिषभाऊ इंगळे  सर ,सुरेशभाऊ सेलव्होटे, सौ.सेलव्होटे ताई आणि समस्त विद्यार्थिनींचे भारतीय नारी रक्षा संघटना शाखा राळेगावच्या अध्यक्षा सौ.संतोषी राजजी वर्मा यांनी मनापासून आभार व्यक्त करते.

Previous Post Next Post