हिवरखेड प्रतिनिधी:-अर्जुन खिरोडकार.
हिवरखेड येथील सोनवाडी फाट्या जवळील पत्रकार भवनात दिनांक ६, जानेवारीला बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करून पत्रकार दिवस साजरा करण्यात आला, उपस्थित पत्रकार बांधवांनी बाळशास्त्रीजी यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला, बाळशास्त्री यांनी १८३२ रोजी दर्पण नावाचे वृत्त प्रकाशित केले होते, त्याच्या निर्भिड सत्य पत्रकारीतेवरच आजच्या पत्रकाराने पत्रकारिता करावी असे मनोगत व्यक्त करण्यात आले असून बाळशास्त्रीजी यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, यावेळी उपस्थित जेष्ठ पत्रकार राजेश पांडव, संदीप इंगळे, अनिल कवळकार, धीरज बजाज, जितेश कारिया ,राहुल गिर्हे ,अर्जुन खिरोडकर, उपस्थित होते,