अप्पर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या विशेष पथकाने शनिवारी रात्री नांदुरा तालुक्यातील तिकोड़ी येथे देशी विदेशी दारू, शस्त्र व गुटखा जप्त करण्यात यश मिळविले असून एका जेरबंद करण्यात आले आहे.अप्पर पोलिस अधीक्षक यांच्या पथकाला गुप्त बातमी दाराकडून खबर मिळाली की नांदुरा तालुक्यातील ग्राम तिकोडी येथे एक व्यक्ती अवैधरित्या विनापरवाना शस्त्र तसेच देशी-विदेशी दारू व महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा बाळगत आहे. या माहितीच्या आधारे पथकाने ग्राम तिकोडी येथे असणा-या राजू बडे यांच्या जगदंबा किराणा दुकान व घरामध्ये धाड टाकली असता त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला तसेच मानवी आरोग्यास अपायकारक असलेला गुटखा किंमत २३ हजार ७६० रुपये, देशी विदेशी दारू किंमत १३ हजार १९० रुपये तसेच तीन तलवारी व एक मोठा चाकू किंमत ६००० रुपये व नगदी २५३० रुपये असा एकूण ४५ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून आरोपी राजू बडे याचे विरुद्ध नांदुरा पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलं आहे.
अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या पथकाने पकडला गुटखा, शस्त्र व दारू.तिकोड़ी येथी दुकानावर धड टाकून केली कारवाई..
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी/सुरज देशमुख