क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त डॉ आंबेडकर विद्यालयात,जळगाव जामोद येथे माळी महासंघ शाखा जळगाव (जामोद) व डॉ आंबेडकर विद्यालय जळगाव (जामोद) यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्री आई यांची जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी विश्वमंदिर एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी ॲड. श्री एस. वाय. खिरोडकार हे होते. तर प्रमुख मार्गदर्शक मुख्याध्यापक श्री व्ही. टी. भारसाकळे सर व आर पी हिवराळे सर उपस्थित होते.प्रथम दिवशी वर्ग 4 ते 10 च्या विद्यार्थांचे वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करणात आले या स्पर्धेत जवळपास 40 हुन अधिक विद्यार्थांनी सहभाग घेतला. सहभागी विद्यार्थांनी सावित्रीबाई फुले यांचे जीवन आणि कार्य या विषयावर उत्कृष्ठ अशी भाषणे दिलीत.विशेष करून मराठी ,हिंदी व इंग्रजी या तीनही भाषां मधून आपले विचार व्यक्त केले.कार्यक्रमच्या दुसऱ्या दिवशी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. जवळपास 60 विद्यार्थिनींनी स्पर्धेत भाग घेऊन समाजप्रबोधनात्मक विविध विषयांवर आधारित आकर्षक रांगोळ्या काढल्या.तर कार्यक्रमाच्या तिसऱ्या दिवशी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.जवळपास 80 विद्यार्थांनी निबंध स्पर्धेत भाग घेतला.ही निबंध व वक्तृत्व स्पर्धा दोन गटात घेण्यात आली. पहिल्या गटात ई 4 ते 7 च्या तर दुसऱ्या गटात 8 ते 10 च्या विद्यार्थांनी सहभाग घेतला.या प्रसंगी काही विद्यार्थी मुलींनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री के ओ इंगळे यांनी केले. तर अनुमोदन श्री के आर पवार सर व आभार प्रदर्शन श्री व्ही यु सोळंके यांनी केले. रांगोळी स्पर्धे साठी श्री टी एम पाचपोर सर श्री विजय काळपांडे सर सौ आर पी आमले मॅडम व श्री विजय गायगोल सर यांनी परिश्रम घेतले.व परीक्षक म्हणून श्री शरद सातव सर यांची उपस्थिती होती.सर्व कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता पर्यवेक्षक श्री पी पी भागवत,श्री डी व्ही इंगळे व समस्त शिक्षक वृंदानी परिश्रम घेतले.
डॉ. आंबेडकर विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती निमित्त वक्तृत्व, रांगोळी व निबंध स्पर्धा संपन्न..
जळगाव जामोद प्रतिनिधी,