आदिवासी विकास महामंडळ कडून शेतकऱ्यांची विडंबना.माजी जि प सदस्य सदाशिवराव खडके यांचे उपोषण...


राजु भास्करे /गौलखेडा बाजार 

धारणी तालुक्यातील हरिसाल येथील आदिवासी विकास महामंडळाच्या मका खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची घोर विडंबना करीत आहे.प्रशासनाच्या चुकीच्या धोरणाचा बळी शेतकऱ्यांना बनवत असल्याने  कोठा येथील माजी जि प सदस्य व अल्पभूधारक शेतकरी सदाशिवराव खडके यांनी आदिवासी विकास महामंडळाच्या विरोधात उपोषणाला सुरवात केली आहे.आदिवासी विकास महामंडळ मार्फत माका ज्वारी ई इतर कडधान्याची खरेदी केली जाते त्याअनुषंगाने वेळेवर खरीप हंगाम संपताच शेतातून शेतकरी पिकाची काढणी करतो तेंव्हा खरेदी करणे गरजेचे असते. परंतु नाफेड व आदिवासी विकास विभागाच्या अडेल्टाट्टू धोरणामुळे सादर खरेदी ही दिन महिने उशिरा सुरु केल्याने त्या धान्याला घरी सांभाळून ठेवणे फार कठीण आहे. मेळघाट च्या गरीब शेतकऱ्यांच्या लहानश्या घरात धान्य  ठेवावं की आपल्या कुटुंबाला ठेवावं हे कळत नसताना धान्य सांभाळलं आणि आता हरिसाल येथील महामंडळ च्या खरेदी केंद्रावर मका घेऊन गेल्यावर ग्रेडर पुन्हा घरी परत घेऊन जा व सोंडे साफ करून आणा म्हणून मका परत करत आहे.त्यामुळे आदिवासी शेतकरी जीवावर उदार झाल्याने  आंदोलन करीत आहेत. शेतकऱ्यांच्या धान्य खरेदी करणार नाही तो पर्यंत भर थंडीत उपोषण सोडणार नाही अशी भूमिका घेत माजी जि. प. सदस्य सदाशिवराव खडके हे उपोषणावर बसले आहेत.

Previous Post Next Post