धारणी येथील किडस केअर शाळेमध्ये औदिच्य ब्राम्हण समाज संस्थेकडून कोविड लसीकरण कॅम्प चे आयोजन केले होते. सादर कॅम्प मध्ये इयत्ता नौवी ते बारावी पर्यंत च्या 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण संपन्न झाले तजनंतर ब्राम्हण समाज संस्थेकडून मुलांना बिस्कीट व आहाराचे वितरण औदीच ब्रह्महन समाजाच्या युवकांनी केले.औदीच्य ब्राह्मण समाज संस्था द्वारा कोवीड -19 टीकाकरणनसाठी आरोग्य विभागाशी समन्वय करून आयोजित केले होते.यासोबतच ब्राम्हण समाज संस्थेकडून धारणी तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. काही दिवसापूर्वी कोविड च्या लाकडाऊन च्या काळामध्ये गावागावात जाऊन अन्नाचे किट पुरविण्यात आले होते.त्यानंतर विश्व्शांतीसाठी यज्ञ हवन केले. अश्याप्रकारे विविध सामाजिक उपक्रम या संस्थेद्वारे नियमित सुरु आहेत.या कार्यक्रममासाठी संस्थेचे अध्यक्ष :हेमंत पंड्या, उपाध्यष : पराग जोशी तसेच इतर सदस्य मार्गदर्शक प्रभाशंकर पुरोहित, जगदीश पंड्या, गौरीशंकर पुरोहित ,जतिन पुरोहित, तुषार जोशी, गौरव पुरोहित, कान्हा भट्ट तसेच मुुख्याध्यापक राजेश पात्रे ,शिक्षक रूपेश राठौड,कमलेश भगत, डॉ. इगळे सर, आरोग्य सेविका कोकिला सावलकर, अॉपरेटर रूपेश राठौड यांनी सहकार्य केले.आणि यापुढे कोणत्याही शाळेत लसीकरण कॅम्प ठेवल्यास तेथे विधा्यार्थ्यांना बिस्कीट पुरविण्यात येईल असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष पांड्या यांनी केले.
औदीच्य ब्राम्हण समाज संस्था द्वारा कोविड लसीकरण.किड्स केअर शाळेतील विद्यालयात मुलांना बिस्कीट व खाऊंचे वाटप...
राजु भास्करे /गौलखेडा बाजार