निवाना येथील रहिवासी असलेले शांत संयमी सुस्वभावी सर्वसामान्य शिक्षणासाठी झटणारे समाज कार्यात नेहमी सहभागी होणारे समाजभान जपणारे समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचारावर कडकडून विरोध करून समाजाला योग्यरीत्या न्याय देणारे तरुण सोपान सोळंके गुरुजी यांची दिनांक 16 जानेवारी शिक्षक आघाडी जळगाव जामोद तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सदैव शिक्षकांसाठी झटणारे शिक्षकांचे प्रश्न सातत्याने सोडविणारे शिक्षक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत दादा देशपांडे यांनी अमरावती शिक्षक आघाडी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत एका नियुक्ती पत्राद्वारे सोपान सोळंके गुरूजी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.सर्व सामान्य शिक्षकांना न्याय मिळवून शिक्षक आघाडी संघटना मजबुतीसाठी प्रयत्न करीत राहणार अशी अपेक्षा त्यांच्याकडून करण्यात आली आहे. सदर नियुक्ती तीन वर्षासाठी करण्यात आली आहे. सोपान सोळंके गुरुजी आपल्या निवडीचे श्रेय शिक्षक आघाडीचे सर्व पदाधिकारी व संस्थापक अध्यक्ष श्रीकांत दादा देशपांडे यांना दिले सोपान सोळुंके गुरुजी यांचे सर्व स्तरातील शिक्षक वर्गा कडून कौतुक होत आहे..
शिक्षक आघाडी संघटनेच्या जळगाव जामोद तालुकाध्यक्षपदी सोपान सोळंके यांची नियुक्ती...
जळगांव जा.प्रतिनिधी:-