प्रतिनिधी/प्रशांत भोपळे.
हिवरखेड येथील विकास मैदान येथील प्रजापिता ब्रम्हकुमारी विश्वविद्यालय हिवरखेड येथील ओमशांती पाठशालेत चंद्रकांत भोपळे गुरुजी यांचे प्रमुख अध्यक्षतेखाली व पाठशालेच्या मुख्य संचालिका ब्रम्हकूमारी वैशाली दिदी यांचे हस्ते पञकार शाम भोपळे, अध्यक्ष रीतेश टीलावत, प्रा. संतोष राऊत, जितेंद्र लाखोटीया, बाळासाहेब नेरकर, मनिष भुडके, धिरज बजाज,सजंय मानके, राजेश पांडव,अर्जुन खिरडकर, गजानन राठोड, फारुख भाई, सतिष इंगळे इत्यादी पञकार बांधवाचा सत्कार करण्यात आला. यावेळी योग ध्यानाद्वारे मनावर ताबा मिळविण्यासाठी मनाला शांतता लाभण्यासाठी पञकार बांधवानी पाठशालेत यावे, असे संचालीका वैशाली दीदी यांनी प्रवचनाद्वारे सांगितले. आपल्या लेखनीद्वारे अध्यात्माचा प्रसार करुन जगाला शांतीचा मार्ग दाखवावा असेही त्या म्हणाल्या. यावेळी सत्कार मूर्ती श्याम भोपळे, प्रा. सतोष राऊत, धिरज बजाज,बाळासाहेब नेरकर यांनी पञकाराच्या लेखनीच्या घडामोडी मुळे जनतेतील सकारात्मक- नकारात्मक बाबीच्या ऊल्लेखामुळे पञकाराला दोन्ही बाजुला जनतेत मिसळुन रोष ओढवुन घ्यावा लागतो, असे प्रमुख सत्कारमुर्तीनी आपल्या विविध विषयाला अनुसरुन बाजु मांडताना स्पष्ट केले. या कार्यक्रमाचे संचलन कु.सुलभा येलुकार दीदी यांनी केले यांनतर आजच्या ब्रम्हशांती दिनाला ब्रम्हभोज प्रसाद होऊन कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी वासुदेव येलुकार, अग्रवाल, भडगूरुजी येनकर, शर्मा तसेच पाठशालेत येणारे शिवबाबा प्रेमी हजर होते.