अबब!!! चिखलदरा तालुक्यात चाळीस हजाराच्यावर मजुर नरेगाच्या कामावर...


 राजु भास्करे /चिखलदरा 

अमरावती जिल्ह्यातील  चिखलदरा तालुक्यात नरेगाच्या कामावर तब्बल दररोज  चाळीस हजाराच्यावर मजूर काम करीत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात नरेगाच्या कामावर सर्वाधिक मजूर उपस्थिती असलेला तालुका म्हणून चिखलदरा तालुक्याचे नाव अव्वलस्थानी आहे.एका चिखलदरा तालुक्याच्या भरवश्यावर संपूर्ण जिल्ह्याचा टार्गेट पुर्ण होतो.कामासाठी स्थलांतर ही मेळघाटची गंभीर समस्या आहे . त्यासाठी  तालुक्यातील अधिकाऱ्यांना धारेवर धरले जाते. ही गंभीर समस्या उद्भवू नये म्हणून चिखलदऱ्याच्या तहसीलदार श्रीमती माया माने व गटविकास अधिकारी जयंत बाबरे यांनी संयुक्त पणे नियोजन करून कंत्राटी कामाचाऱ्यांच्या मार्फत कामाचे नियोजन करून मोठ्या प्रमाणात कामे उपलब्ध करून दिली आहेत,मागेल त्याला नरेगाचे काम मिळत असल्याने तालुक्यातील मजूर वर्ग सुखावला आहे. आजपर्यंत च्या सर्वाधिक मजुर उपस्थितीची नोंद झाली आहे. मजुरांच्या हाताला काम मिळावे यासाठी तहसीलदार दर आठवड्याला सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आढावा घेत आहेत. त्यांना येणाऱ्या समस्या वेळेवर सोडविल्या जात असल्याने हे सर्व शक्य होत असल्याचे कंत्राटी तांत्रिक सहाय्य्कविलास कलमटे व उमेश येवले यांनी सांगितले आहे. नरेगाचे कामामध्ये प्रामुख्याने जलसंधारणाची कामे हाती घेण्यात आली आहे. त्यामध्ये सि.सि.टी., डि.सि.टी. व्याट,नालाखोलिकरण, जलशोषक चर, तसेच वैयक्तिक लाभच्या योजनेनेचे काम केल्या जात आहे.यामध्ये गुरांचा गोठा,व शेतकऱ्यांच्या शेताची बांध बांधिस्ताची कामे होत आहेत.तसेच सार्वजनिक कामे ज्यामध्ये शाळेला वालकंपाउंड, अंगणवाडी भवन,पांदन रस्ते,अशी कामे केवळ कंत्राटी कर्मचाऱ्याच्या भरवश्यावर सुरु आहेत.शासकीय यंत्रणा (लाईन डिपार्टमेंट )नरेगाची कामे करण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येत आहे.जर त्यांनी त्यांची जबाबदारी नीट पार पाडली  तर साठ हजाराच्यावर मजुर उपस्थिती वाढू शकते.मजुराणा गावातच कामे उपलब्ध करून देणे व वेळेवर बँक खात्यात मजूरी मिळत असल्याने मेळघाट मधील मजूर आनंदित आहे. यासाठी   कंत्राटी तत्वावर कमी मानधनावर काम करणारे विलास कळमटे तुषार लोखंडे,पवन नवलकर,उमेश येवले,नितेश निंबाळकर,नितेश सूर्यवंशी,राजेश साऊरकर,मंदा झारखंडे,ओंकार हेकडे,संदीप राठोड,विनोद राठोड,प्रमोद नागले,कमलेश नागले,हरिकिशोर आठवले,संजू आठवले,आरती बछलेप्रवीण ढोले,प्रवीण खडके, दयाराम जांबेकर,प्यारेलाल बेलसरे,प्रकाश राजने कंत्राटी सहाय्य्क कार्यक्रम अधिकारी अमलेश मोरले,साजन कास्‍देकर,नितीन शिरभाते,रुपेश आडवीकर.वरील कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत.

-----------------------

मजुरांना गावातच भरपूर काम मिळत असल्याने स्थलांतरण कमी झाले आहे.

..दयाराम काळे समाजकल्याण सभापती जि. प. अमरावती 

-------------_----------

मागेल त्याला काम या शासनाच्या घोषवाक्य प्रमाणे कामाचे नियोजन करून कामे उपलब्ध करून दिली जात आहेत.

,श्रीमती माया माने 

तहसीलदार चिखलदरा

Previous Post Next Post