तेल्हारा पोलीस स्टेशन मध्ये पोलीस उदय दिनानिमीत्त ता.७/जानेवारी रोजी पोलीस स्टेशन तेल्हारा येथे रक्तदान शिबीराचे आयोजन पोलीस स्टेशन तर्फे करण्यात आले होते. पंचगव्हाण नर्सिपुर चे तंटामुक्ती अध्यक्ष गब्बर जमदार यांनी आपल्या गावातील ६० रक्त दातेने रक्त दान केले त्या बदल त्यांचा सत्कार करण्यात आला आता पर्यंत पंचगव्हाण कडून सर्वात मोठी बाब आहे ठाणेदार ज्ञानोबा फड साहेब यांनी गब्बर जमदार,एनुल्ला खान व गावकऱ्यांच्या स्वागत करण्यात आले त्यामध्ये परीसरातील नागरीक, पत्रकार, विदयार्थी, महिला, पोलीस अंमलदार असे एकुण १०० रक्तदाते यांनी रक्तदान केले. सदर रक्तदान शिबिरास अपेक्षापेक्षा जास्त प्रतिसाद मिळाल्याने रक्तबॅग कमी पडल्या त्यामुळे २० ते २५ रक्तदाते विना रक्तदान करता परत जावे लागले या शिबीराकरीता शासकीय महाविदयालय अकोला येथील रक्तपेढी यांना बोलाविण्यात आले होते. शासकीय रक्तपेढी येथील डॉ. शेगोकार मॅडम, डॉ. तायडे मॅडम तसेच त्यांचा स्टाफ यांनी सदर शिबीर यशस्वीरीत्या पार पाडले.सदर रक्तदान शिबीर मा. पोलीस अधिक्षक जी. श्रीधर सो. मा. अपर पोलीस अधिदाक श्रीमती मोनिका राऊत मॅडम अकोला, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी रितु खोखर मॅडम उप विभाग अकोट, यांचे मार्गदर्शनात मा. सहा. पोलीस निरीक्षक श्री. ज्ञानोबा फड सा, तसेच पोलीस स्टेशन तेल्हारा सर्व स्टाफ यांनी पार पाडले.
पोलीस स्टेशन मध्ये रक्त दान.पोलीस उदय दिनानिमित्त संपन्न...
तेल्हारा प्रतिनिधी/ संघपाल गवारगुरु