जळगांव जामोद प्रतिनिधी:-
दिनांक २५ जानेवारी पासून येनगांव,काजेगांव,वडशिंगी येथिल ग्रामस्थ आमरण उपोषणाला बसले आहेत यामध्ये गावकऱ्यांनी जळगांव जामोद तालुक्यातील १२३५ प्रपत्र ड यादी तील नावे नामंजूर करण्यात आले . वास्तविक आहे की अतिशय गरजु लोकांची नावे नामंजूर करण्यात आली आहेत जे लोक भुमिहिन ,बेघर आहेत अशा लोकांची पक्के घर व ५ एकर शेती दाखविण्यात आली आहे त्यासाठी पुन्हा सर्वे करून वंचित गरजु लोकांना मंजुर यादिमध्ये समाविष्ट करुनच ग्रामसभेत मंजुरात देण्यात यावी अन्यथा मंजुरात देऊ नये असे निवेदनात म्हटले आहे.उपोषण कर्त्यामध्ये आशिष वायझोडे,अशोक उज्जेनकर, प्रशांत बनकर,नर्मदाबाई देवचे व इतर ग्रामस्थांचा समावेश आहे .या उपोषणाला वंचित बहुजन आघाडी चे तालुका उपाध्यक्ष सुनिल बोदडे व राष्ट्रवादी चे तालुका अध्यक्ष प्रमोद सपकाळ,शहर अध्यक्ष अजहर देशमुख, महादेव भालतडक अताउल्ला खान, यांनी जाहीर पाठिंबा दिला.