श्रीपादकृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात साजरा...


 जळगांव जा.प्रतिनिधी:-अनिल भगत.

25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस लोकशाही व्यवस्थेमध्ये मतदान प्रक्रियेला महत्त्वपूर्ण स्थान असून मतदारांकडुन निवडल्या जाणाऱ्या प्रतिनिधींनी द्वारेच देशाचे शासन आणि प्रशासन चालत असते आणि म्हणूनच लोकशाही मध्ये निष्पक्ष व निर्भयपणे होणाऱ्या मतदान प्रक्रियेला महत्त्वपूर्ण स्थान आहे हे लक्षात घेऊनच 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिन म्हणून भारतामध्ये साजरा केल्या जातो. १२व्या राष्ट्रीय मतदार दिनाच्या पार्श्वभूमीवर दिनांक 25 जानेवारी 2022रोजी महाविद्यालयांमध्ये राज्यशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रीय मतदार दिन शपथ कार्यक्रम घेण्यात आला हा कार्यक्रम महाविद्यालयाच्या प्रांगणात मध्ये माननीय प्राचार्य यांच्या  अध्यक्षतेखाली तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व मोजक्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पार पडला रासेयो समन्वयक प्राध्यापक श्री गिरीश कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले तर प्राध्यापक डॉक्टर निलेश निंबाळकर यांनी लोकशाही प्रति निष्ठेसंबंधी मतदार शपथ तिची वाचन केले या कार्यक्रमाला आभासी पद्धतीने विविध वर्गातील विद्यार्थी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते.मतदार शपथ कार्यक्रमा बरोबरच राज्यशास्त्र विभागाद्वारे विद्यार्थ्यांसाठी मतदार जागृती वस्तुनिष्ठ प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आलेली होती मतदार जागृती संबंधी गुगल फॉर्म द्वारे पाठविण्यात आलेल्या या प्रश्नमंजुषा ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला 350 च्या वरती विद्यार्थ्यांनी ही प्रश्नावली सोडली

Previous Post Next Post