आश्रम शाळा चिखली येथील वॉल कंपाऊंड बांधकामात करोडो रुपयांचा भ्रष्टाचार गगांराम जाम्बेंकर यांचा आरोप...


 राजु भास्करे /चिखलदरा 

चिखलदरा तालुक्यातील शासकीय आदिवासी आश्रम शाळा चिखली येथील वाल कंपाऊंड बांधकामात करोडो रुपयांचा गैरव्यवहार व भ्रष्टाचार करून निकृष्ट बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारावर फौजीदारी गुन्हा दाखल करावे.मेलघाट आदिवासी विद्यार्थी  संघटक गंगाराम जाम्भेकर यांनी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता चिखली आश्रम शाळेचे जुनी वॉल कंपाऊंडची दुरुस्ती केली आहे. व बांधकाम करताना चुना, मातीची जास्त प्रमाणात वापर केल्याने जागोजागी भेगा पडले असल्याचे दिसून येत आहे.  कुंपण तार खूपच कमी दर्जाचे असून काही ठिकाणचे कुंपण तारांचे अंतर खूपच जास्त आहे. स्टेटमेंट नुसार जी टाइप कुंपण ताराची ७ आडवी तार पाहिजे होती. त्या ऐवजी ६ आडवी तार वापरण्यात आले.  संरक्षण भिंतीला लावण्यात आलेले जी टाइप ताराच्या कोपऱ्या पूर्णपणे उघडलेले आहे. शाळेचा मागील बाजूने असलेल्या संरक्षण भिंतीस असलेले गेट नादुरूस्त आहे. व बीजागरे पूर्णपणे उखडलेले आहेत. तसेच समोरील गेटमध्ये पाया लावण्यात आलेले नाहीत. सिमेंट काँक्रेट द्वारे केलेले बांधकाम अपूर्ण केलेले आहेत. संबंधित कंत्राटदारांवर नियमानुसार कारवाई करून संबंधितांवर फौजदारी गुन्हा  दाखल करावे, अशी मागणी मेलघाट आदिवासी विद्यार्थी व संघटक गंगाराम जांभेकर यांनी केली आहे.

Previous Post Next Post