यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथील शिवाजी उद्यान मध्ये दिनांक 6 जानेवारी रोजी आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती दिनी मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून समाजातील गुणवंत विध्यार्थी वैभव चौबे, दर्पण मुथा, सौं.स्मिता कानडजे यांचा सत्कार यावेळी करण्यात आला तर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबानां मदत सुद्धा यावेळी करण्यात आली तसेच प्रा. अशोक पिंपरे यांचे पत्रकारितेतील योगदाना बाबत प्रा. वसंतराव पुरके यांच्या कडून सत्कार यावेळी करण्यात आला .यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष राळेगाव तहसीलदार रविंद्र कानडजे, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आ.प्रा. वसंतराव पुरके,पोलीस निरिक्षक संजय चौबे, जिल्हा ग्रामीण पत्रकार संघटनेचे सचिव गोकुल खडसे, यवतमाळ जिल्हा काँग्रेस सरचिटणीस जानराव गिरी, राळेगाव काँग्रेस शहर अध्यक्ष प्रदिप ठुणे,राळेगाव पत्रकार संघटनेचे अध्यक्ष प्रा. अशोक पिंपरे, जेष्ठ पत्रकार डॉ. के. एस. वर्मा, भाजपा जिल्हा सरचिटणीस ऍड. प्रफुल चौहान, हे यावेळी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अशोक पिंपरे यांनी केले.. यावेळी मंचावरील अनेक मान्यवरानी आपले मनोगत पत्रकार दिनाचे औचित्य साधून व्यक्त केले. या मराठी पत्रकार दिनाच्या कार्यक्रमास राळेगाव तालुक्यातील अनेक गणमान्य नागरिक, पत्रकार संघटनेचे सदस्य मोठया संख्येने यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन राजेश काळे यांनी केले तर आभार प्रदर्शन मोहन देशमुख यांनी केले....
राळेगाव येथे मराठी पत्रकार दिन उत्साहात साजरा समाजातील गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबानां केली मदत...
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी संजय कारवटकर