जि. प. उच्च प्राथमिक शाळा चिचखेडा येथे बालिका दिन संपन्न...


 राजु भास्करे /चिखलदरा

चिखलदरा तालुक्यातील जि. प. उच्च प्राथमिक शाळा चिचखेडा येथे जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकीचा या अभियाना अंतर्गत विविध उपक्रम जि. प. शाळा चिचखेडा येथे राबविण्यात येत असुन दि. ३ जानेवारीला सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन व महिला शिक्षण दिन म्हणून साजरी करण्यात आली. या दिनी शाळेतील मुलींनी सावित्रीबाई ची वेशभूषा प्रदान करुन त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. व प्रतिमेचे पुजन करण्यात आले. दि. ४ जानेवारीला शाळेतील इयत्ता ६ वी व ७ वी च्या किशोरवयीन मुलींना शाळेतील टाळे मॅडम आशा वर्कर विना चव्हाण व प्रमिला भास्करे यांनी मार्गदर्शन केले. तसेच दि. ६ जानेवारीला यशस्वी महिलांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यामध्ये ANM तायडे मॅडम व डॉक्टर नुतन डांगे यांची मुलाखत शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रमोद दखने यांनी घेतली. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना मुलाखत तंत्र अवगत झाले. शिक्षणाकरीता अभ्यास कसा करावा, परिस्थितीवर मात कशी करावी व आरोग्य विषयक माहिती डांगे मॅडम यांनी दिली. या कार्यक्रमाला यशस्वीते करीता शाळेतील विद्यार्थ्यी विद्यार्थ्यांनी तसेच मुख्याध्यापक प्रमोद दखने सर, सहशिक्षक गजानन गायन सर, कु. अनिता माळोदे, सौ. माधुरी टाके यांनी परिश्रम घेतले. व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरीता आनंद बेलकर यांनी सहकार्य केले.

Previous Post Next Post