समाजाशिवाय माणूस मोठा होत नाही. मा. आ. अँड.किरणबापू सरनाईक..

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सुरज देशमुख R.C24  न्युज 

 माणसाला जर आयुष्यात यश गाठून प्रगतीच्या शिखरावर चढायचे असेल तर त्याला समाजाचा पाठिंबा घ्यावाच लागतो. समाजाशिवाय कोणताच माणूस मोठा होत नाही असे प्रतिपादन आमदार किरणबापू सरनाईक यांनी देशमुख समाज जागृती मंडळाच्या वतीने आयोजित सोहळ्यामध्ये केले. अकोला येथील साई गजानन लाँन येथे रविवारी मोठ्या थाटात पार पडलेल्या देशमुख समाज स्नेहमिलन तथा देशमुख भूषण पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाबीजचे संचालक वल्लभराव देशमुख अमडापुरकर हे होते तर उद्घाटक म्हणून आ. किरणबापू सरनाईक उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर आ. नितीनबापू देशमुख यांच्या सुविद्य पत्नी प्रांजलीताई नितीन देशमुख, प्रख्यात अस्थीरोग तज्ञ डॉ. शैलेश देशमुख, डॉ. दत्ताराव देशमुख, माजी सनदी अधिकारी आर.एस. देशमुख, काँग्रेस पुढारी अविनाश उर्फ भैय्यासाहेब देशमुख, प्रसिद्ध उद्योजक प्रशांतदादा देशमुख, प्रा. संजय देशमुख, श्रीमती कविताताई वसंतराव देशमुख, श्रीमती कविताताई ढोरे, देशमुख समाज मंडळाच्या महिला अध्यक्षा सौ. कल्पनाताई प्रदीपराव देशमुख, सौ. राजश्री प्रशांतराव देशमुख, सौ. प्रतिभाताई देशमुख यांचेसह गणमान्य प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, देशमुख समाज भूषण डॉ. पंजाबराव देशमुख, देशमुख समाज प्रेरणास्थान भय्यूजी महाराज यांच्या पूजनाने करण्यात आली. यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून जागृती मंडळाच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी समाजातील विविध क्षेत्रात प्राविण्य गाजविणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये विशेष करून डाँ. मुरलीधर देशमुख, एन.टि.देशमुख, गणेशराव देशमुख, नरेश देशमुख, पोलीस निरिक्षक नितीन देशमुख, सोनालीताई देशमुख, ज्योतीताई देशमुख, दादाराव देशमुख, अलकाताई देशमुख, वैभव देशमुख, अक्षय देशमुख, पंकज देशमुख, मंडळाचे अध्यक्ष संजय कृष्णराव देशमुख सचिव नितीन देशमुख शिवाणी देशमुख, प्रशांत देशमुख,सौ.दीपिका देशमुख विवाण देशमुख यांचा समावेश होता. प्रा. संजय देशमुख यांनी आपल्या प्रास्ताविकात समाज जागृत करून समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल लोकांच्या गरजा आवश्यकतेनुसार पूर्ण करण्याचं काम समाजातील श्रीमंत लोकांनी केले पाहिजे असे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. वल्लभरावबापू देशमुख यांनी या मंडळाने खरंच नावाप्रमाणे समाज जागृत करण्याचं काम हाती घेतलेला आहे ते कौतुकास्पद आहे असे म्हटले.यावेळी समाजाच्या संकेत स्थळाचे आणि वधूवर परिचय करिता कुर्यात सदा मंगलम या ब्लाँगचे लोकार्पण करण्यात आले. तसेच समाजाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशनही मान्यवरांनी केले. समाजातील दुर्बल महिला घटकांना शिलाई मशिन तसेच अल्पभूधारक शेतकऱ्यांना बियाणे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संजयराव देशमुख यांनी केले तर सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन मनोज देशमुख आणि एस.के.देशमुख यांनी केले. सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी देशमुख समाज जागृती मंडळाचे सर्व पदाधिकारी, महिला, पुरुष, तरुण तसेच तरुणींनी अथक परिश्रम घेतले.

Previous Post Next Post