राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी
मेळघाट मध्ये चिखलदरा तालुक्यातील चिचखेडा येथिल विवादित संरपच आशा साकोम यांच्या विरोधात अविश्वास ठराव सहा विरुद्ध एक पारित झाला असून त्या अखेर पायउतार झाल्या आहेत.चिंचखेडा येथील सदैव विवादीत असलेल्या सरपंचा कु. आशा बाबुलाल साकोम यांच्या विरुद्ध सहा सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव तहसीलदार यांच्याकडे सादर केला होता त्याअनुषंगाने दिनांक 1.1.2022 रोजी सभा घेऊन सहा सदस्या सौं. आशा मोहन अजनेरिया, सौं बबली कोगे, सौं. हिराय चव्हाण, सौं. रेखा बेलकर,राजेंद्र पारधे,राजेश सूर्यवंशी यांनी सरपंच आशा साकोम यांच्या विरुद्ध ठराव घेतल्याने अखेर आशा साकोम पायउतार झाल्या.