सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या साखरखेरडा येथे दर शुक्रवारी भरणारा आठवडी बाजार .उद्या मकर संक्रातीचे त्या दिवशी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे .त्यामुळे ऐन संक्रांतीच्या सणावर महिलांना खरेदी करता येणार नाही .सध्या करून रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे त्यामुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून साखरखेर्डा येथील उद्या भरणारा आठवडी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे तसे साखरखेडा मध्ये 14 जानेवारी रोजी दवंडी देऊन जागृती करण्यात येत आहे .साखरखेर्डा आहे व्यापारीदृष्ट्या मोठे गाव आहे 38 खेड्यातील लोक कामानिमित्त साखरखेर्डा येथे येत असतात,संक्रात सण म्हटल्यावर अनेक महिला वान देण्यासाठी भाजीपाला खरेदी करत असतात .पर्यंत संक्रांतीच्या सणावर आठवडी बाजार बंद असल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडत आहे .तरीही 14 जानेवारी रोजी संध्याकाळी खरेदी करण्याकरता नागरिकांनी गर्दी केली होती .
पुढील आदेश येईपर्यंत उद्या भरणारा साखरखेर्डा येथील आठवडी बाजार बंद !
सिंदखेड राजा/सचिन खंडारे