नांदुरा नगरपरिषद मुख्याधिकारी कार्यालयाकडून करण्यात आलेल्या घरकुल वाटपात प्रचंड भ्रष्टाचार झाला असून हे घरकुल वाटप पूर्णपणे नियमबाह्य असून यामध्ये पात्र लोकांना डावलून अपात्र लोकांकडून चिरीमिरी घेऊन त्यांना घरकुलाचा लाभ देण्यात आला असून या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून यामध्ये घरकुल घोटाळा वाटपास सर्व दोषींवर कठोर कारवाई करावी अशी तक्रार नांदुरा शहरातील दत्तात्रय प्रकाश करांगळे यांनी जिल्हा प्रशासन अधिकारी, न. वि. शा. जिल्हा अधिकारी कार्यालय बुलढाणा येथे दिनांक २९/१२/२०२१ रोजी तक्रार अर्जाद्वारे केली आहे.सविस्तर वृत्त असे की नांदुरा नगर परिषदेचे मुख्याधिकारी कार्यालय भ्रष्टाचाराचा अड्डा बनला असून चिरीमिरी घेऊन अपात्र लोकांना पंतप्रधान आवास योजना घरकुल पात्र व पात्र असलेल्या लोकांना अपात्र ठरवून हक्काच्या घरकुला पासून वंचित ठेवण्याचे काम या कार्यालयात मुख्याधिकारी यांच्या छत्र छायेखाली सर्रासपणे होत आहेत. असेच प्रकरण दत्तात्रय प्रकाश करांगळे यांनी उघडकिस आणले असून नांदुरा येथील खुदावंतपुर येथील शेतसर्वे १/९ मधील वासुदेव रामधन वानखडे यांचा मालकीहक्क नसतांना शेत संबंधित शेत अकृषक नसताना मुख्याधिकारी कार्यालय संबंधित व्यक्तीची असिसमेंट नक्कल कर पावती तयार करते आवश्यक ना हरकत प्रमाणपत्र तयार करून त्यांच्याकडे घरकुलासाठी आवश्यक कागदपत्रे नसतांनाही घरकुल मंजूर करणे अशी अनेक नियमबाह्य कामे करून घरकुल योजनेत प्रचंड भ्रष्टाचार झाला असून शासनाच्या पैशाचा दुरुपयोग झाला. सदर घरकुल मंजूर करून संबंधिताला पहिला हप्ता ४०,००० रुपये कशाच्या आधारे दिले गेले हे मुख्याधिकारी कार्यालय करीत आहे. या प्रकरणी तक्रारदारानी कागदो पत्री पुरावे सादर केले असून या सर्व प्रकरणाची तात्काळ चौकशी करून शासनाची फसवणूक करणाऱ्या मुख्याधिकारी नगर परिषद कार्यालय नांदुरा यांच्या कार्यालयातील संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी व आपण केलेल्या कार्यवाही बाबत मला उलट टपाली पत्र देण्यात यावे व दोषींवर लवकरात लवकर कठोर कारवाई करावी अशी मागणी दत्तात्रय प्रकाश करांगळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालययात केली आहे.
नांदुरा नगर परिषदेत मुख्याधिकारी कार्यालया कडूनच पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घरकुल वाटपात प्रचंड भ्रष्टाचार- अन्यायग्रस्ताकडून जिल्हा प्रशासनाकडे तक्रार दाखल...
मंगल काकडे/प्रतिनिधी..