गोपालकृष्ण गोरक्षण संस्थेमध्ये मकर संक्रांत दिनी करण्यात आले गोमातेचे पूजन...


 जळगांव जा.प्रतिनिधी:-

दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मकर संक्रांतीनिमित्त जळगाव जामोद येथील गोपाळकृष्ण गौरक्षण संस्थेमध्ये विशेष गो पूजनाचा कार्यक्रम covid-19 नियमांचे पालन करीत दिनांक 14 जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सदर कार्यक्रमाचे आयोजन गोपाल कृष्ण गौरक्षण संस्थांचे अध्यक्ष सुरेश मोदी यांच्यासह अन्य संचालक मंडळ दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करीत असतात. यावर्षी सुद्धा कोरोणाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे कार्यक्रम प्रमुख लोकांच्याच उपस्थिती मध्ये संपन्न झाला. असून सदर कार्यक्रमाला गौरक्षण च्या सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. यावेळी जळगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील अंबुलकर यांनीसुद्धा सहकुटुंब गोपाल कृष्ण गोरक्षण संस्थेमध्ये येऊन गोमातेचे पूजन केले. यावेळी कोकाटे सर अजय वानखडे कांडलकर सर अर्जुन घोलप श्रीकृष्ण केदार श्रीराम बेल के निलेश शर्मा दत्ता पाटील,रमेश ताडे,राजेश बाठे, स्वातीताई वाकेकर, स्नेहा भंसली, राजु वाडे, आरती पलन नीता अग्रवाल, उषा अग्रवाल, यांच्यासह जळगाव जामोद येथील गोप्रेमी महिलां तसेच गावातील मान्यवरांनी येऊन संस्थेमध्ये गो पूजन केले. याच बरोबर कुंजबिहारी गांधी यांनी सपत्नीक संस्थेमध्ये येऊन व मातेचे पूजन केले व त्यांनी नर्मदा परिक्रमा च्या आठवणींना उजाळा देत त्यांचा अनुभव त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला. सदर कार्यक्रम कोविड नियमांचे पालन करीत संपन्न झाला.

Previous Post Next Post