मुलींनी शिक्षणाची कास धरावी- वंदनाताई भगत...


 जळगांव जामोद प्रतिनिधी:-

जळगाव जामोद तालुक्यातील चालठाणा येथे दिनांक 3 जानेवारी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून टेंभुर्ना ता- खामगाव येथील सदन व्यापारी आद. गणेशभाउ मोरे व त्यांच्या सहचारिणी सुषमाताई मोरे यांनी चालठाणा येथील गोरगरीब व आदिवासी बांधवांना शंभर (१००) ब्लँकेटचे वाटप केले ते सतत गोरगरीब लोकांना कोणत्या ना कोणत्या माध्यमातून  आदिवासी भागात जाऊन दान देत असतात. सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतीमेचे सर्व मान्यवरांचे हस्ते धुप दीपाने पुजन करन्यात आले व मुलांनी शाळेची कास धरावी करीता वंदनाताई भगत यांची मुलगी सांची वंदना प्रल्हाद भगत हीने शाळेतील मुलांना व मुलींना वही व पेनाचे वाटप केले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून भारतीय बौद्ध महासभेच्या ता- शाखा महीला उपाध्यक्षा आद. वंदनाताई भगत यांनी ज्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी मनुवाद्यांच्या कोणत्याही विरोधाला न जुमानता महिलांना शिक्षणाची दारे उघडी केली. त्या सावित्रीच्या लेकींनी शिक्षणाची कास धरावी असे आव्हान केले प्रत्येक स्त्रीने चुल आणि मुल ईतक्यावरच सीमीत न राहता सावित्री माईंचा आदर्श घ्यावा असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती साहेबराव भगत माजी ता- अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा हे होते, रामभाऊ तायडे,  प्रल्हाद भगत, आद. सुषमाताई गणेश मोरे, यश मोरे, पोलिस पाटील वीजय तायडे, व गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष आद. गणेश मोरे हे होते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदीश हातेकर ता- अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा जळगाव जामोद यांनी केले.

Previous Post Next Post