महापुरुषांच्या स्मारकांचे भोवतालची जागा स्वच्छ आणि कचरामुक्त ठेवा या मागणीसाठी मनसेचे निवेदन...

जळगांव जा.प्रतिनिधी:-

जळगाव जामोद शहरातील सर्व महापुरुषांच्या स्मारक स्थळी तसेच उद्यानाजवळ मोठ्या प्रमाणात कचरा ढेर तसेच मोठ्या प्रमाणात अस्वच्छता दिसून येत आहे. त्यामुळे दिनांक 4 जानेवारी रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगाव जामोद तालुक्याच्या वतीने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना ह्या सर्व स्मारकांच्या जागा उद्यानांच्या जागा कचरा मुक्त स्वच्छ ठेवण्याकरिता देण्यात आले निवेदन यामध्ये तलाव पुरा येथील छत्रपती शिवाजी महाराजांची उद्या नाही त्या उद्यानाची आज रोजी दयनीय अवस्था झाली आहे अख्खा महाराष्ट्र नव्हे तर भारताची ते आराध्य दैवत आहेत आणि जळगाव जामोद येथील त्यांच्या स्मारकाचा स्थळी मोठ्या प्रमाणात अस्वच्छता तसेच कचऱ्याचे ढेर जमा झालेले असून त्या उद्यानामध्ये पूर्ण मातीचा ढीग जमलेला आहे. आज पर्यंत नगर परिषदेमध्ये भाजपा सत्येत होती त्यांनी फक्त शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर निवडणुकीपुरता केला होता आणि पाच वर्ष त्यांच्या स्मारकाकडे त्यांच्या उद्यानाकडे अतिशय दुर्लक्ष केले त्यामुळेच या उद्यानाची दयनीय अवस्था झाली आहे. या सह जळगाव जामोद शहरामध्ये जेवढे ही काही स्मारक आहेत त्यांच्या अवतीभवतीचा परिसर स्वच्छ करण्याकरिता एक कामगारांची नेमणूक करण्यात यावी व संपूर्ण परिसर नेहमी करता स्वच्छ व सुंदर ठेवावा. असे निवेदन मनसेच्या वतीने देण्यात आले निवेदनाला आश्वासन देत मुख्याधिकारी यांनी एका दिवसात संपूर्ण परिसर साफसफाई करून देतो अशा आश्वासन दिले निवेदन देतेवेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष राजू राऊत, शहराध्यक्ष नागेश भटकर, शहर उपाध्यक्ष गोपाल वानखडे सहसचिव वैभव येनकर, शाखाध्यक्ष योगेश म्हसाळ, संघटक कुलाल तायडे ईश्वर इंगळे अक्षय मानकर आनंद सपकाळ विशाल नागपुरे, कृष्णा बावस्कर प्रफुल्ल जुमळे, अमोल ताडे, गोपाल ताडे, सागर अग्रवाल रोहित वानखडे यांच्यासह बहुसंख्य मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Previous Post Next Post