बुधवार वेस अकोट जिल्हा अकोला येथे राहणारा कुख्यात गुंड अमोल श्रीकृष्ण चिंचोळकर वय 32 वर्ष या गुंडावर यापूर्वी जबरी चोरी करणे,डांबून ठेवणे व दुखापत करून जबरी चोरी करणे, रस्ता अडवणूक करून पैशाची मागणी करणे, शिवीगाळ करून भांडणे की धमकी देणे बेकायदेशीर शस्त्र बाळगणे असे बरेच गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. त्याच्यावर यापूर्वी विविध कलमान्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती परंतु तो प्रतिबंधक कारवाई करून सुद्धा जुमानत नसल्याने त्याचे विरोधात गंभीर दखल घेत या आरोपी च्या गुन्हेगारी वृत्तीस आळा बसावा याकरिता पोलिस अधीक्षक अकोला यांनी त्यास स्थानबद्ध करण्याबाबत चा प्रस्ताव जिल्हादंडाधिकारी अकोला यांना सादर केला होता जिल्हा दंडाअधिकारी निमा अरोरा यांनी सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी करून स्वतःचे स्त्रोताद्वारे माहिती मिळवून सदर कुख्यात गुंड हा धोकादायक व्यक्ती असल्याची खात्री झाल्याने त्यास एका वर्षाकरिता अकोला जिल्हा कारागृहात स्थानबद्ध ठेवल्या बाबतचा आदेश दिनांक 24 जानेवारी रोजी पारित केला असून जिल्हा दंडाधिकारी अकोला यांच्या आदेशावरून कुख्यात गुंड अमोल श्रीकृष्ण चिंचोळकर याचा तात्काळ शोध घेऊन त्यास सदरचा आदेश तामील करून दिनांक 24 जानेवारी रोजी जिल्हा कारागृह स्थानबद्ध करण्यात आले सदरची कारवाई पूर्ण करण्याकरिता पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांचे मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत तसेच सहाय्यक पोलिस अधिक्षक अकोट उपविभाग अकोट गुन्हे शाखा येथील पोलिस निरीक्षक संतोष महल्ले, पोलीस हेडकॉन्स्टेबल मंगेश महल्ले यांनी तसेच पोलीस स्टेशन अकोट शहर येथील पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे तसेच पोलीस स्टेशन मधील कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेत कुख्यात गुंडास अक्षर स्थानबद्ध केले अकोला जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहत शांतता कायम राहावी याकरिता अशा प्रकारचे गुन्हे करणारे व कारवाईस न जुमानणाऱ्या सराईत गुन्हेगारांची माहिती संकलित करण्यात आली असून त्यांच्या विरोधातही एम पी डी ए खाली कारवाई प्रस्तावित असून जुलै 2020 ते जानेवारी 2022 या कालावधीमध्ये एम पी डी ए कायद्यान्वये एकूण 55 गुन्हेगारांवर स्थानबद्ध करण्याची कारवाई करण्यात आली आहे.
अकोट येथील कुख्यात गुंडास एम.पी.डी.ए ॲक्ट अन्वये एका वर्षाकरिता केले स्थानबद्ध...
अकोट ता.प्रतिनिधी:-सय्यद शकिल.