आसलगाव येथील उल्हास महोदे यांची रुग्णसेवेची पुन्हा आली प्रचिती. आदिवासी डिलिव्हरी पेशंट ला पोचवलं सोनाळा ग्रामीण रुग्णालयात...


 जळगांव जा.प्रतिनिधी:-

रुग्ण सेवेकरिता आरोग्य दुत धाऊन आला.या धकाधकीच्या जीवनात कोणालाच कोना साठी वेळ नाही.पण आपल्या संपूर्ण हयातीत रुग्ण सेवा करणारे आसलगाव येथील उल्हास माहोदे यांच्या रुग्णसेवेची प्रचिती आज पुन्हा एकदा दिसून आली.आसलगाव वरून जामोद मार्गे वारिहनुमान येथे परिवारासह जात असतांना भगत पुरा येथे एक आदिवासी परिवार रोडवर त्यांच्या गाडीवर समोर आडवा झाला आणि आमच्या पेशंटला भयंकर त्रास होत असुन आम्हाला सोनाळ्या च्या सरकारी दवाखान्या पर्यंत न्याच अशा विनवण्या करू लागला. रुग्णसेवेचे तळमळ असलेल्या उल्हास माहोदेंनी गरोदर स्त्रि ची परिस्थिती पाहुण तातडीने आपल्या गाडी तील परिवाराच्या  सदस्यांना  तिथे उतरून देऊन त्या महिला पेशंटला सोनाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यासाठी बसवले आणि तिथूनच सोनाळा येथील स्वप्नील देशमुख आणि शेख अफरोज यांना फोन करून सूचना केली व तुम्ही प्राथमिक आरोग्य केंद्रात पोचून डॉक्टर साहेब डॉक्टर साहेबांना या डिलिव्हरी पेशंट बद्दल माहिती द्या व त्यांना तयार ठेवा असे सांगितले.त्यादृष्टीने शेख अफरोज यांनी ताबडतोब तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रमोद रोजगार यांना माहिती दिली.डॉक्टर साहेबांनी व विशाखा पाटील मॅडम यांनी तातडीने त्या पेशंटला ॲडमिट करून  योग्य उपचार करून त्या गरोदर महिलेची  डिलिव्हरी पार पाडली व आई व बाळाचे प्राण वाचवले.कुसुम कुमार जमरा असे त्या महीलेचे नाव ति वसाळी येथिल असून तिला मुलगी झाली आहे.आशा परिस्थितीत कामात पडलेल्या उल्हास माहोदे,डॉ प्रमोद रोजतकार, विशाखा पाटील मॅडम व त्यांचे सहकारी तसेच स्वप्निल देशमुख व शेख अफरोज यांचे त्या परिवाराने आभार मानले कि आपल्या सर्वांन मुळे आई व बाळाचे प्राण वाचले.

Previous Post Next Post