दुनी येथील ज्ञानमंदिर हायस्कूल व नाना साहेब भिसे कनिष्ठ महाविद्यालय यांना मेळघाट मधील पहिली सायबर स्मार्ट स्कूल चे नामांकन प्राप्त झाले आहे. सायबर स्मार्ट स्कूल म्हणजे ज्यामध्ये मुलांनी वापरायचे मोबाईल्स यावरती घरच्यांचा लक्ष असणे गरजेचे आहे तसेच मुलांची होणारी फसगत किंवा त्यांच्या बाबतीत घडणार्या घटना तसेच बँकिंगचे फ्रॉड व मुलांमध्ये निर्माण होणारे डिप्रेशन हे मोबाईलच्या गैरवापर याने होते म्हणून मुलांना किंवा विद्यार्थ्यांना त्याबद्दल अवगत करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर डब्ल्युएनएस फाउंडेशन एक सर्वे राबवला त्याचे दोन महिने ट्रेनिंग घेतले त्या ट्रेनिंग मध्ये ज्ञानमंदिर हायस्कूल व नाना साहेब भिसे कनिष्ठ महाविद्यालय या मधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्यासाठी प्राध्यापक खरात सर ATL इन्चार्ज यांनी सातत्याने प्रयत्न केले त्या प्रयत्नाचे यश म्हणून स्कूल आज सायबर स्मार्ट स्कूल म्हणून नामांकित करण्यात आली यासाठी वेळोवेळी प्राचार्य भापकर सर यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांची होणारी फसगत त्याचबरोबर त्यांच्यामध्ये निर्माण होणारे बरेचसे मानसिक आजार व डिप्रेशन यापासून विद्यार्थ्यांना दूर ठेवण्यासाठी पालकांमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये सायबर क्राईम बद्दल जनजागृती करण्यासाठी आपल्याकडे राष्ट्रीय स्तरावर सातत्याने प्रयत्न होतात पण त्या प्रयत्नांमध्ये उदासीनता दिसून येते म्हणून शासन स्तरावर विद्यार्थी व पालक यांना जागृत करण्यासाठी अशा प्रकारची स्कूल निर्माण करणे शासनाचे उद्दिष्ट आहे त्यामध्ये दुनी येथील शाळा व कनिष्ठ महाविद्यालय मेळघाट मध्ये प्रथम व अमरावती जिल्ह्यामध्ये द्वितीय स्थानावर आहे.या यशा साठी संस्थेचे संस्थापक नाना साहेब भिसे , अध्यक्ष विना मलविय, सचिव रमेश जिराफे, कार्याध्यक्ष प्रदीप भिसे , समाजसेवक शुभम जिराफे यांनी अभिनंदन केले आहे.
दुनी येथील शाळा बनली मेळघाट मधील पहिली सायबर स्मार्ट स्कूल...
राजु भास्करे /चिखलदरा