शिक्षक सेनेतर्फे आदर्श शिक्षक श्रीकृष्ण भटकर यांचा सत्कार संपन्न...


जळगाव जामोद प्रतिनिधी:-  

बुलढाणा जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणारा 2020 21 आदर्श शिक्षक पुरस्कार जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक मराठी शाळा वडशिंगी येथील सहाय्यक शिक्षक  यांना जाहीर झाला . त्यानिमित्त शिक्षक सेना जळगाव जामोद तर्फे त्यांचा सपत्नीक सत्कार त्यांचे राहते घरी दिनांक  11 जानेवारी 2022ला करण्यात आला.ISO मानांकन प्राप्त जिल्हा परिषद केंद्रिय मराठी प्राथमिक शाळा ही जळगांव जामोद तालुक्यातील पहिली ISO शाळा करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणारेआणि  विविध उपक्रम   राबवून वडशिंगी शाळा नेहमी सर्व बाबतीत अग्रेसर ठेवणारे आदर्श आणि उपक्रम शील शिक्षक श्री श्रीकृष्ण वासुदेव भटकर यांना कोरोना कालावधीत सन 2020 -21 या सत्रातील महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिला जाणारा बुलडाणा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.सन 2018 पासून वडशिंगी शाळेवर बदली झाल्यापासून शाळेत नवनवीन उपक्रम राबवुन,शासनाच्या प्रत्येक परिपत्रकानुसार सर्व कार्यक्रम यशस्वीपणे त्यांनी पार पाडले.त्यांना मिळालेला पुरस्कारामुळे त्यांच्यावर संपूर्ण तालुका भरातून कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सत्कार प्रसंगी उपस्थित प्रत्येक सदस्याने आपले मनोगत व्यक्त केले. भीमानंद तायडे सर, उमेश खारोडे सर, गजानन काकडे सर यांनी शाल श्रीफळ देऊन सरांचा सत्कार केला .दिलीप वानखडे ,निलेश काळे , आशिष चिंचोळकर यांनी भेटवस्तू देऊन सरांचा सत्कार केला. कुमारी सुनिता तायडे मॅडम व कुमारी दिपाली बोरसे मॕडम यांनी सौ. प्रतिभा श्रीकृष्ण भटकर यांचा सरांना समर्थपणे साथ दिल्याबद्दल सत्कार केला.हनुमान इंगळे, गोपाल क्षिरसागर, संदीप इंगळे, संतोष गोतरकर ,समाधान निकम, प्रसेनजित तायडे यांनी सरांच्या  कार्याचा शब्दात गौरव केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल भगत तर आभार संतोष वेरूळकर यांनी केले . सत्काराला शिक्षकमिञ बहुसंख्येने हजर होते.

Previous Post Next Post